मराठा सेवा संघाच्या विचारधारेने समाजात एकोपा बंधुता निर्माण झाला : अमोल बापू शिंदे*

*मराठा सेवा संघाच्या विचारधारेने समाजात एकोपा बंधुता निर्माण झाला : अमोल बापू शिंदे* 



सोलापूर- मराठा सेवा संघ ही बहुजन महापुरुषांची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अपार कष्ट घेतले. सामाजिक एकोपा बंधुता जपला सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले इतिहास पुरुषांच कार्य समाजासमोर मांडले, असं मत अमोल बापू शिंदे यांनी व्यक्त केले.
         मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने मराठा सेवा संघाचा वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघाची विचारधारा मुस्लिम समाजात रुजवण्यासाठी ज्या प्रथमतः सुरुवात केली त्यात अन्वर सैपन, हाजी के. बी. नदाफ, समीऊल्ला शेख, म. हुसेन बसरी, मुसा खान यांचा कृतज्ञता पर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी महापौर आरिफ शेख, रुग्णसेवक बाबा मिस्त्री, इम्तियाज कमिशनर, पोपट भोसले, हारुण शेख, फय्याज बागवान, अलीम सय्यद, सोहेब चौधरी, अल्ताफ लिंबूवाले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच आयोजन छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू हुंडेकरी, तन्वीर गुलजार, जावेद बद्दी, कादर भागानगरी, अमजद पठाण, रुस्तुम शेख, रिजवान दंडोती, रिजवान शेख, गफार खान, कय्युम मोहोळकर, हरिश शेख, कासीम बेलीफ, तन्वीर शेख, गनी करनूल, मुसदीत चौधरी, हुजेर बागवान, अय्यान बागवान, अफान बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments