देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचा मोलाचा वाटा : डॉ. वीरभद्र दंडे*

*देशाच्या सर्वांगीण विकासात शिक्षकांचा मोलाचा वाटा : डॉ. वीरभद्र दंडे*


सोलापूर- रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी आयोजित नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्कार वितरण सोहळा नुकताच व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल येथे थाटात संपन्न झाला.
स्पर्धेच्या युगात डिग्रीपेक्षा ज्ञानाला महत्त्व असून ज्ञानदानाचे पुण्यकर्म हे शिक्षक अविरत करत असतात. शिक्षक हे विद्यार्थी घडवत असताना देशसेवेचे स्पुरण त्यांच्या मनात बिंबवतात, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचे सिनेट सदस्य डॉ. वीरभद्र दंडे यांनी रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी आयोजित नेशन बिल्डर अवॉर्ड २०२४ दरम्यान केले.
रोटरी इंटरनॅशनलच्यावतीने प्रतीवर्षी सप्टेंबर महिन्यात नेशन बिल्डर अवॉर्ड असते, रोटरीत आमचा विश्वास आहे की शिक्षक हे राष्ट्रनिर्माते आहेत कारण तेच उद्याच्या तरुणांचा विकास करतात. आम्ही शिक्षक आणि त्यांच्या कार्यावर खूप भर देतो म्हणून आम्ही भारतातील उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार करतो, रोटरीने, पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाच्या मोठ्या यशानंतर, T-E-A-C-H नावाच्या कार्यक्रमाद्वारे देशातून निरक्षरता निर्मूलनाचे नवीन मिशन सुरू केले आहे. (T-E-A-C-H.) T - शिक्षकांच्या सहाय्यासाठी, E ई-लर्निंगसाठी, A प्रौढ साक्षरतेसाठी, C बाल विकासासाठी आणि H आनंदी शाळांसाठी. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे असिस्टंट गव्हर्नर. रो. विठ्ठल वंगा यांनी सांगितले. रोटरीच्या सामाजिक कार्याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी ने ८ समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करुन सन्मान केला.
पुरस्कार प्राप्त शिक्षक- डॉ. उमाकांत जाधव, इंजि. बसवराज बिराजदार, प्रा. सचिन मोहिते, डॉ. युवराज सुरवसे, सौ. कोडम उमा, सौ. बाबानगरे रेखा, सौ. राजश्री पंतोजी, सौ. आयेशा अलीम यांचा रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेसिडेंट रो. रविराज दरेकर यांनी केले, पाहुण्यांचा परिचय रो. महेश साळुंके यांनी करुन दिली, सत्कारमूर्तीचे परिचय रो. सत्यम दुधनकर यांनी करुन दिली, सूत्रसंचलन महेश साळुंके व आभार रो. डॉ. अकबरसाहेब नदाफ यांनी मानले. यावेळी प्रकल्प संचालक रो. नागेश शेंडगे, रोटरी सदस्य अनिल चांडक, योगीनाथ कुडते, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments