*नॅशनल फ्लॉवर प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न*
परभणी: (वार्ताहर) आजाद एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित नॅशनल फ्लॉवर प्राथमिक शाळा परभणी येथे शनिवार दिनांक 25 जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे यशस्वी आयोजन येथील गोल्डन फंक्शन हॉल येथे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाफिज काझी मोहज़ीबुद्दीन साहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आझाद एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे सचिव अली शाह खान साहेब, संस्थेचे अध्यक्ष इम्रान खान, माजी उपशिक्षणाधिकारी नासेर खान, अस्लम खान (संस्थेचे सदस्य), शेख इब्राहिम पटेल (सचिव गुलाम नबी आझाद स्कूल, परभणी), आझम हाश्मी (सेवानिवृत्त शिक्षक), शेख मारुफ (सेक्रेटरी इंडियन स्कूल ऑफ लर्निंग अँड इंटिग्रेशन), डॉ.शायक़ अली हाश्मी, फरीद अहमद खान नवघरे श्रीकृष्ण गुलाबराव (मुख्याध्यापक राजीव गांधी हायस्कूल, ताडबोरगाव), घौरी जावेद, अशफाक हाश्मी आणि नाहीद सुलताना आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष इम्रान खान यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी प्रास्ताविक अली शाह खानसाहेब यांनी केले. त्यांनी संस्थेअंतर्गत चालणाऱ्या सात शाळांची थोडक्यात माहिती सादर केली, ते म्हणाले की, जे पालक आपल्या मुलांकडे लक्ष देतात, त्यांची मुले पुढे जातात, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष द्यावे. मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना शाळेत घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे.
अध्यक्षीय भाषणात काझी मोहज़ीबुद्दीन यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संस्था, शाळा आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचे समाजावर होणारे दुष्परिणाम व पालकांची मुलांच्या शिक्षणासंदर्भात होत असलेले दुर्लक्ष याविषयी विविध गाणी, नाटिका सादर केल्या.
यावेळी संस्थांतर्गत चालणाऱ्या सात शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2023-24 चा "उत्कृष्ट कर्मचारी" पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये मोहंमद आमेर मोहंमद अन्वर, नवघरे श्री कृष्णा गुलाब राव, जावेद खान आबिद मियाँ घौरी, शेख अस्लम शेख अब्दुल रज़्ज़ाक़, आयेशा बेगम अब्दुल मजीद अन्सारी, नाहिद सुलताना मोहंमद इसहाक़, शगुफ्ता समरीन, सय्यद जावेद इनामदार, मोहंमद एजाज़ मोहंमद इलियास, जोगदंड बाबूशहा, शेख शाकीर अब्दुल ग़फ्फार, मोमीन इलियास अब्दुल बशीर, जंगले ज्ञानोबा इत्यादींचा समावेश आहे. व तसेच सर्व शाळांचे कायदेशीर मार्गदर्शन करणाऱ्या ॲड मेराज खान यांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. अशाप्रकारे वार्षिक स्नेहसंमेलन शाळा समिती अध्यक्षा सोफिया अंजुम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने यशस्वीरीत्या संपन्न झाला.

0 Comments