छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या विचाराला अभिप्रेत काम छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे आहे : सी ए बंदपट्टे

 छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या विचाराला अभिप्रेत काम 

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे आहे : सी ए बंदपट्टे


 


सोलापूर- मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्यावतीने विविध मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आला होता. याप्रसंगी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे नुतन अध्यक्ष सी ए सुशीलकुमार बंदपट्टे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे स्थापन करताना सर्व जाती धर्मांना सोबत घेतले आणि समान न्याय दिले, जाती पेक्षा कर्तृत्वाला संधी दिली न्यायी राजा म्हणून आजही गुणगान केले जाते. आज मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड पण सर्व जाती धर्माच्या लोकांना सन्मान करण्याच काम करत आहेत. 

 या कार्यक्रमात सी ए सुशीलकुमार बंदपट्टे  यांची शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरच्या नुतन अध्यक्ष म्हणून, वसीम खाजाभाई बुरहान यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग मुंबई सदस्य, राजा बागवान यांना ओघ फौंडेशन मुंबईच्या "जीवनगौरव" पुरस्कार मिळाल्याबद्दल,    मुस्लिम आरक्षणासाठी सोलापूर ते मुंबई पायी यात्रा करणाऱ्या इरफान शेख  व म शफीक रचभरे यांनी उमरा या पवित्र यात्रेस रवाना होणार असल्यामुळे त्याचा सत्कारसारंभ  छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.



या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  इम्तियाज म.उस्मान मर्चंट व फय्याजभाई मुन्शी यांच्या प्रमुख उपस्थितीत लक्ष्मी मार्केट येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन हाजी मतीन बागवान शहराध्यक्ष छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांनी केले याप्रसंगी राजू हुंडेकरी, बशीर सय्यद, माजी नगरसेवक हारुण शेख, जावेद बद्दी, तन्वीर गुलजार, कादर भागानगरी, कय्युम मोहळकर आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते




Post a Comment

0 Comments