किनगाव येथे पत्रकार भवनाच्या बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही.
सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील
- अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथे मराठी पत्रकार संघाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी किनगाव येथे पत्रकार भवनाच्या बांधकामास निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे आणि समाज घडविण्यात पत्रकारांची भुमीका अत्यंत महत्त्वाची आहे पत्रकारिता केवळ माहिती पोहोचविण्याचे काम करत नाहीत तर ते समाजाच्या नैतिक, सामाजिक व राजकिय परस्थितीवर प्रभाव टाकते.पत्रकार समाजाची आराखडा दाखवणारे आणि त्याला दीशा देणारे असतात. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम पत्रकारांनी करावे असे सांगितले.
VO :- या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा रिपाईचे उपाअध्यक्ष सुनील वाहुळे, रामजी दहीफळ अप्पर संचालक औद्योगिक सुरक्षा संचालनालय मुंबई, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे, उपसरपंच विठ्ठलराव बोडके, माजी सभापती किशोर मुंढे, माजी जि.प. सदस्य त्र्यंबक गुट्टे, द्वारकादास शामकुमार ग्रुपचे सदाशिव जाधव, गटशिक्षणाधिकारी बी.एम.ढोकाडे, माजी सरपंच पारनाथ गुट्टे, युवा उद्योजक भागवत गुट्टे, सतीश लड्डा, पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड, महेश अर्बन बँकचे संचालक सतीश कल्याणे, सोसायटीचे उपचेअरमन देवेंद्र आमले, माजी उपसरपंच निजाम शेख,दिलदार शेख, मराठी पत्रकार संघाचे सचिव जाकेर कुरेशी, सिंगर स्वप्नील गोरटे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी पत्रकार संघाचे सहसचिव असलम शेख यांनी केले तर आभार अध्यक्ष शेटीबा श्रंगारे, अन्वर बागवान सूत्रसंचालन ऋषी महाजन, बस्वराज हुडगे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अफजल मोमीन,प्रा.रत्नाकर नळेगावकर,बालाजी आचार्य,गणेश किनकर,खलील शेख,रूद्रा मुरकुटे, यांनी परिश्रम घेतले.



0 Comments