116 किलो गांजा वाहनासह जप्त. तेलंगाना, ओडिसा व औसा येथील तीन आरोपीवर गुन्हा दाखल. 15 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस ठाणे औसा ची कारवाई.*



*116 किलो गांजा वाहनासह जप्त. तेलंगाना, ओडिसा व औसा येथील तीन आरोपीवर गुन्हा दाखल. 15 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस ठाणे औसा ची कारवाई.





औसा 

             याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 19 मार्च रोजी औसा पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, महात्मा फुलेनगर, औसा येथे एक व्यक्ती त्याचे साथीदारसह राहते घरामध्ये स्वताच्या आर्थिक फायदयासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगुन त्याची चोरटी विक्री करीत आहे. सदरची माहिती वरीष्ठांना कळवून शासकीय पंचसह महात्मा फुलेनगर,औसा येथे 16.26 वाजता छापा मारला. सदर ठिकाणी एक संशयीत स्कार्पीओ वाहन क्रमांक ए.पी. 20 एन. 3637 दिसुन आली. त्यामध्ये दोन इसम 


1) रमेश आर यादाईह, वय 45 वर्ष रा. ओबलपुर, जाफरगड वरगंल राज्य तेलंगणा.


 2) निबास लक्ष्मीकांत बडइ, वय 54 वर्ष रा. एमपीव्ही 82 मलकागिरी, मलाभरम राज्य ओडिसा.


            असे मिळून आले सदर वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनात मध्ये गांजाचे प्लॉस्टीकने रॅपींग केलेले पॉकीटे व मोबाईल मिळाले. त्यादोघाकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा 


3) परशुराम देविदास कांबळे, रा. फुलेनगर औसा.


           याने आमच्याकडून विकत घेतला असल्याचे सांगितले. त्यावरून परशुराम कांबळे यांचे घराची झडती घेतली असता त्याच्या घरातपण पाच प्लॉॉस्टीकच्या गोण्या मध्ये लाहन मोठ्या आकाराचे प्लॉस्टीकने रॅपींग केलेले पॉकीटे व गाडी मध्ये मिळून आलेले असे एकुण 67 गांजाची पॉकिटे मिळून आले.

            116.14 किलो ग्रॅम वजानाचा ओला व सुखा गांजा, एक सिल्वर ब्लॅक रंगाची महिंद्रा स्कार्पीओ क्रमांक ए.पी. 20 एन. 3637, दोन मोबाईल फोन असा एकुण 15,81,400 रुपयेचा माल मिळून आल्याने नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे औसा येथे गुरनं. 108/2025 कलम 20 गुगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोन आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली असून एक आरोपी परशुराम देविदास कांबळे राहणार फुलेनगर औसा हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


             सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लातूर, श्री.सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक लातूर डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी औसा कुमार चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, प्रमोद बोंडले, सफौ. संजय कांबळे, पोलीस अंमलदार रामकिशन गुटे,मुबाजोददीन सय्यद, मोतीराम घुले, भरत भुरे, गोविंद पाटील, बालीका सरवदे यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments