६ वर्षाचा अबुजर अहमद शेख यांचा पहिला उपवास (रोजा) पुर्ण

 ६ वर्षाचा अबुजर अहमद शेख यांचा  पहिला उपवास (रोजा) पुर्ण 





इम्रान सय्यद 

मुरूम शहर प्रतिनिधी 


मुरुम  : मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरु झाला असून. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करून धार्मिक संस्कृतीचे जतन करतात. याचाच एक भाग म्हणून मुरूम शहरातील सामाजिक कार्य करत असलेले अहमद सल्लाम शेख यांचा सहा वर्षांचा मुलगा  अबुजर अहमद शेख  याने  सुरू झालेल्या रोजा उपवास धरल्यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे .शहरातील अबुजर शेख  याने रोजाचा निर्धार करून शनिवार पहाटे पासून उपवास धरला. दिवसभर पाणी सुद्धा न पिता उपवास सोडण्याच्या निर्धारित वेळेनंतर उपवास सोडून नमाज अदा केली.

Post a Comment

0 Comments