हिंदु मुस्लिम महिलांचा उद्या "इफ्तार संवाद"चे आयोजन* *एशिअन सेंटर आणि गाजीउद्दीन अकादमीचा संयुक्त उपक्रम*

 *हिंदु मुस्लिम महिलांचा उद्या "इफ्तार संवाद"चे आयोजन*

*एशिअन सेंटर आणि गाजीउद्दीन अकादमीचा संयुक्त उपक्रम*





सोलापूर- परस्पर स्नेह आणि विश्वास वृद्धिंगत व्हावा या हेतूने एशिअन सेंटर आणि गाजीउद्दीन अकादमीच्यावतीने उद्या शनिवार दि. २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी 5.00 वाजता मुस्लिम पाच्छा पेठ येथील सोशल हायस्कूलच्या प्रांगणात हिंदू मुस्लिम महिलांसाठी "इफ्तार संवाद" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मेराज आसिफ इकबाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

या इफ्तार कार्यक्रमात डॉ. आसमा खान यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी डॉ. अस्मिता बालगांवकर, स.पो. नि. ज्योत्सना भांबिष्ठे, शकुंतला सुर्यवंशी उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमास सोलापूरातील हिंदू मुस्लिम भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सरीता मोकाशी व  महेजबीन सरफराज अहमद यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments