लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हसेगाव येथे 2021-2025 बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
हसेगाव (ता. औसा) – लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, हसेगाव येथे दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी 2021-2025 बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात व औपचारिक वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. श्रीहरी वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी यशस्वी करिअरसाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी मेहनत, सातत्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वतःवर विश्वास या गोष्टींचे महत्त्व विशद करत, भविष्यातील वाटचालीसाठी विद्यार्थी वर्गाला मोलाचे मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमास श्री. वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक श्री. नंदकिशोर बावगे यांचीही विशेष उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणी शेअर करत शिक्षकवृंदांचे आभार मानले.
हा समारंभ विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी अनुभव ठरला.
0 Comments