पैशा साठी मित्रा चा खून करून फरार झालेल्या आरोपीस जन्मपेठ. 5 हजार रूपयेचा दंडही ठोठावला .प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,लातूर यांचा महत्वपूर्ण निकाल..
लातूर (प्रतिनिधी)
आरोपी सोमनाथ राजेंद्र सगर, रा. हरंगुळ (बु) ता. जिल्हा लातूर यांने त्याचा मित्र मयत श्रीकांत उर्फ बबलू आत्मलिंग चिल्लरगे रा. तत्तापूर ता. रेणापूर जि. लातूर याच्या जवळील कोथीबिर ची विक्री करून आनलेली रोख रक्कम बळकवण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात, माने जवळ कुऱ्हाडीने वार करून खून केला होता.
मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादी वरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गफार शेख यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास करून आरोपी विरुद्ध भरपूर पुरावे गोळा करून, तपासाअंती आरोपी विरूध्द पुरावा आल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
मयत श्रीकांत उर्फ बबलू आत्मलिंग चिल्लरगे रा. तत्तापूर ता. रेणापूर जि. लातूर हा नागपूर येथे कोथींबीर विक्री साठी पिकअप गाडी घेऊन गेला होता. सदरील कोथींबीर विक्री करून त्या कोथींबीरीची पट्टी व रक्कम घेऊन लातूर येथे आला. लातूर येथे आरोपी, मयत, इतर साक्षीदार यांनी लातूरमध्ये एका ठिकाणी दि. 29/09/2020 रोजी रात्री पार्टी केली.त्या ठिकाणी मयत श्रीकांत व आरोपी सोमनाथ सगर झोपले. पैशे बळकवळण्याच्या उद्देशाने आरोप सोमनाथ सगर ने मयत श्रीकांत चिल्लारंगे यास कुर्हाडीने मारून गंभीर जखमी करून खून केला व त्याच्या जवळचे कोथिंबीर विकीचे पैसे घेऊन पुणे येथे पळून गेला. पुणे येथे एका लॉजवर राहीला. तपासात आरोपी सोमानाथ हा पुणे येथे असल्याचे निष्पन झालेने पोलीसांनी आरोपीस पुणे येथील लॉज मधून अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या पिशवीत सदरील नागपूर येथे विक्री केलेल्या कोथीबीरीची पट्टी व रक्कम मिळून आली. सदरील प्रकरणात लॉजच्या मॅनेजरचा जबाव, ज्या खाजगी वाहनाने आरोपी पुणे येथे गेला त्या ड्रायवरचा जबाव, डॉक्टरांचा जबाब, तसेच इतर साक्षीदारांचे जवाबही महत्वाचे ठरले.
गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक यानी गफार शेख यांनी तपासाअंती आरोपी विरुद्ध भरपूर पुरावा मिळवून न्यायालयात गुन्हा कलम 302 भा.द.वि. अन्वये दोषारोपपत्र दाखल केले.
प्रकरणात सरकार पक्षातर्फे 18 साक्षीदार तपासण्यात आले. सदरील प्रकरण हे परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारीत असल्याने व सरकार पक्षाने साक्षीपुराव्याची साखळी सिध्द केली असल्यामुळे लातूर येथील मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही. व्ही. पाटील यांनी आरोपी सोमनाथ राजेंद्र सगर रा. हरंगुळ (बु) यास गुन्हा कलम 302 भादवि अन्वये जन्मठेप आणि 5000/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली तसेच दंड न भरल्यास 6 महिना सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.
सदर खटल्यात वरिष्ठांचे मार्गदर्शनात तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गफार शेख त्यांचे मदतनीस पोलिस अंमलदार सूर्यवंशी, कोर्ट मॉनिटरिंग सेलचे पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील, समन्स,वाॅरन्ट चे काम पाहणारे पोलीस अमलदार आयूब शेख, दिलीप लोभे, महिला पोलीस अंमलदार सूमन कोरे यांच्यासह सरकार पक्षाच्या वतीने सहा सरकारी वकील अॅड विद्रुल व्ही. देशपांडे (बोरगांवकर) यांनी काम पाहिले त्यांना अॅड. परमेश्वर बी. तललेवाड यांनी सहकार्य केले.
0 Comments