*प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे : सिनेटर प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला*
*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापूर विद्यापीठात वृक्षारोपण*
सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या संकल्पनेने विद्यापीठाच्या नवीन प्रशासकिय इमारतच्या 482 एकर परिसरात एक लाख झाडे लावण्याच्या संकल्पाचा भाग म्हणून, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरात सिनेटर प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सदर प्रसंगी आपले विचार मांडताना प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला यांनी वाढते हवामानबदल, प्रदूषण आणि जैवविविधतेचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावणे आणि त्याचे संगोपन करणे हेच भविष्यासाठी सर्वात ठोस पाऊल ठरेल याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी पाच कृतीशील उपाय सुचवले त्या पुढीलप्रमाणे १. सक्रीय वृक्षारोपण २. प्लास्टिकमुक्त जीवनशैली ३. पाणी व ऊर्जा बचत ४. रीसायकल आणि पुनर्वापर ५. पर्यावरण शिक्षण.
सोलापुर विद्यापीठ नवीन प्रशासकिय इमारत 482 एकर परिसरात 4 जून जागतिक पर्यावरण दिनी नारळ, केशर, आंबा, स्वीट महुगनी या प्रकारच्या 5000 वृक्षाची लागवड करण्यात आली.
यावेळी प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव डॉ. अतुल लकडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अंधारे, वित्त व लेखा अधिकारी सीए एम. एस. खराडे, व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. देवानंद चिलवंत व प्रा. सचिन गायकवाड, सिनेटर श्री. सिद्धेश्वर स्वामी, सहाय्यक कुलसचिव डॉ. यू. व्ही. मेटकरी, डॉ शिवाजी शिंदे, व श्री सोमनाथ सोनकांबळे, एन. एन. एस. संचालक डॉ. राजेंद्र वडजे, पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. धुळप आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
0 Comments