*नॅशनल उर्दू हायस्कूल परभणीचा उत्कृष्ट निकाल*
परभणी (प्रतिनिधी) येथील नॅशनल उर्दू हायस्कूलने दरवर्षीप्रमाणे यंदाही फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. शाळेचा एकूण निकाल 98 टक्के लागला आहे.
शालेय स्तरावर, शीरीन बेगम शेख ग़ौसोद्दीन (87.40%) आणि शिफा अंजुम शेख मुहम्मद (87.40%) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर आफिफा आयमन शेख शाहिद (86.80%) यांनी दुसरे आणि शेख सुफियान शेख परवेज (82.60%) यांनी तिसरे स्थान पटकावले. याशिवाय अल्फिया शेख अन्सार 79.80%, तुबा बतूल शेख हबीब 78.00%, सुमेरा बेगम सय्यद इमाम 78.00%, फिरदोस जहाँ पठाण मुकर्रम 75.40%, सादिया तबस्सुम मुहम्मद सिराजुद्दीन अन्सारी 74.80%, बुशरा फातेमा आरेफुद्दीन सिद्दीक़ी 74.00%, आयेशा बेगम सय्यद अल्ताफ 71.80%, सबा अंजुम मुहम्मद शौकत 71.20%, अदिबा खानम इम्रान खान 70.20% आणि इतर 13 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे.
या उत्कृष्ट यशाबद्दल आझाद एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक सचिव अल्हाज अली शाह खान सर, अध्यक्ष अल्हाज इम्रान खान सर यांनी मुख्याध्यापिका आयेशा कौसर मॅडम, वर्गशिक्षक शेख मुहम्मद इक़्बाल सर आणि इतर सर्व शिक्षकांचे तसेच सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments