रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्यावतीने* *गुळवंची गावात 100 झाडांचा वृक्षारोपण संपन्न*

 *रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्यावतीने*

*गुळवंची गावात 100 झाडांचा वृक्षारोपण संपन्न*






सोलापूर- पर्यावरणाचे संरक्षण हे रोटरी इंटरनॅशनलच्या सात प्रमुख कार्यक्षेत्रांपैकी एक असून, या उद्दिष्टाशी सुसंगत राहून रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी यांनी गुळवंची ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण अभियान राबवले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी यांच्यावतीने ५०० वृक्ष लागवड मोहिमेचा पहिला टप्पा दिनांक २२ जून २०२५ रोजी गुलवंची येथे १०० झाडांची लागवड करून यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका वनाधिकारी सचिन जोशी यांच्या हस्ते झाले व त्यांनी मार्गदर्शन 100 रोपे लावण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गुळवंचीचे सरपंच सुनील जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष अकबरसाहेब नदाफ, सचिव बसवराज बिराजदार, प्रकल्प प्रमुख योगीनाथ कुडते, तसेच क्लबचे माजी अध्यक्ष महेश साळुंके, नागेश शेंडगे, सत्यम दुधनकर, गुळवंची ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि छावा प्रतिष्ठानचे सदस्य यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अकबरसाहेब नदाफ यांनी तर सूत्रसंचालन  महेश साळुंके व शेवटी आभार प्रदर्शन सचिव बसवराज बिराजदार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments