आमदार संग्राम जगताप तसेच गोपीचंद पडळकर यांनी जाहीरपणे सतत आपल्या भाषणातून मुस्लिम समाजाच्या विरोधात अपशब्द वापरून समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी दोन्ही आमदारांना कठोर कायदेशीर कारवाई करावी




आमदार संग्राम जगताप तसेच गोपीचंद पडळकर यांनी जाहीरपणे सतत आपल्या भाषणातून मुस्लिम समाजाच्या विरोधात अपशब्द वापरून समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी दोन्ही आमदारांना कठोर कायदेशीर कारवाई करावी 






राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)गटाचे आमदार संग्राम जगताप तसेच गोपीचंद पडळकर यांनी जाहीरपणे सतत आपल्या भाषणातून मुस्लिम समाजाच्या विरोधात अपशब्द वापरून समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी दोन्ही आमदारांना कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणीचे निवेदन एम आय एम च्या वतीने दी.२३/ 0६ / २५/ रोजी देण्यात आले यामध्ये मुस्लिम समाजाच्या विषयी द्वेष भावना बाळगून सातत्याने मुस्लिम समाजास टार्गेट करून जातिवाचक शिवीगाळ करणे तसेच मुस्लिम समाजाच्या भावना दुखवण्या संदर्भात विधाने करून दोन धर्माच्या समाजात तेढ निर्माण अशी वक्तव्य करुन गुण्या गोविंदाने राहत असलेल्या दोन समाजात फुट पाडून चिथावणी खोर वक्तव्य करणाऱ्या संविधानिक पदावर असलेल्या आमदार संग्राम जगताप, गोपिचंद पडळकर,यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करुन त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी आणि दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आमदारावर अल्पसंख्याक अँटा्सिटी कायदद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अश्या भाष्य व वल्गना देणाऱ्या आमदारांची आमदार पदावरून हकालपट्टी पट्टी करण्यात यावी अशी वक्तव्य करणाऱ्या आमदारावर कारवाई नाही झाल्यास समस्त मुस्लिम समाज व एम आय एम पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी यावेळी उपस्थित अँड.गफुरुल्लाह हाशमी एम आय एम औसा माजी प्रमुख तथा रहबर-ए-मिल्लत, सय्यद कलिम शहर अध्यक्ष, सैफुल्लाह बागवान, देशमुख शकील,सईद भादेकर,पठाण रसूल, सय्यद मुजीब भाई ईत्यादी एम आय एम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते



Post a Comment

0 Comments