तक्रार देऊन उपोषणाचा इशारा देताच वाळू माफियावर कार्यवाही 2 बोटी नष्ट 5 ते 6 जणांवर गुन्हे दाखल!*

 *तक्रार देऊन उपोषणाचा इशारा देताच वाळू माफियावर कार्यवाही 2 बोटी नष्ट 5 ते 6 जणांवर गुन्हे दाखल!*

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचा इशारा ठरला निर्णायक प्रशासनाने केली कार्यवाही 

*उपोषणा आधीच प्रशासनाचा 'सर्जिकल स्ट्राइक' अवैध वाळू उपसा बंद!*

तक्रार अन उपोषणाच्या इशाऱ्यामुळे जागे झाले प्रशासन कारवाईने खळबळ





निलंगा : प्रतिनिधी

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील तेरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसावर महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे जोरदार कारवाई केली. तक्रारीनंतर त्वरित हालचाल करत दोन बोटी नष्ट करण्यात आल्या असून, पाच ते सहा अज्ञात व्यक्तींवर औराद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*तक्रार, उपोषण आणि कारवाईचा धडाका*

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी निलंगा तालुक्यातील औराद परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केली होती. तसेच, १५ सप्टेंबर 2025 पासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता.

या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेत, ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक घटनास्थळी पाठवले. महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी नदी पात्रात उतरून मोठ्या प्रमाणावर चालू असलेली वाळू उपसाची बेकायदेशीर प्रक्रिया रोखली.

कारवाईचा तपशील: २ लोखंडी कढई बोटी नष्ट, पाच ते सहा अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल, ६६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त, रात्री उशिरापर्यंत ऑपरेशन सुरू

सदर कारवाईत निलंगा तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल दुरपडे, मंडळ अधिकारी आर.व्ही. देशमुख, राजकुमार सोमवंशी, भरत मुंडे, आणि तलाठी वर्गासह अनेक अधिकारी सहभागी झाले होते. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने नदीपात्रातून बोटी बाहेर काढून, वेल्डिंगच्या साह्याने त्या पूर्णतः नष्ट करण्यात आल्या.

तपास सुरूच! मंडळ अधिकारी भरत मुंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस विभाग करीत आहे. ही कारवाई वाळू माफियांना स्पष्ट संदेश देणारी ठरली आहे की, बेकायदेशीर वाळू उपसा खपवून घेतला जाणार नाही.





Post a Comment

0 Comments