*"फिटल मेडिसिन" वरील सी.एम.ई (CME) सत्रास औसा परिसरातील डॉक्टर्सकडून उत्स्फूर्त प्रतिसाद*
औसा प्रतिनिधी
लातूर फिटल मेडिसिन सेंटर आणि औसा होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने "फिटल मेडिसिन" या विषयावर सतत वैद्यकीय शिक्षण (CME) सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्राला औसा परिसरातील डॉक्टर्सकडून भरभरून प्रतिसाद लाभला.
सत्रात गर्भातील बाळाच्या आरोग्याचे महत्त्व, फिटल स्क्रिनिंग, जनुकीय तपासणी, अल्ट्रासोनोग्राफीतील निष्कर्षांचे विश्लेषण तसेच रेडिओलॉजीपलीकडील फिटल मेडिसिनचा व्यापक दृष्टिकोन यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. जन्मजात दोष व अनुवंशिक आजारांचे वेळीच निदान आणि उपचाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन औसा होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. जिलानी पटेल, सचिव डॉ. संदीप खानापुरकर, उपाध्यक्ष डॉ. विनोद जाधव आणि कोषाध्यक्ष डॉ. भीमराव पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमास डॉ. पद्मावती तोष्णीवाल (MBBS, DNB, ICOG, FMF (UK)) आणि डॉ. प्रमोद तोष्णीवाल (MBBS, MD - बालरोग तज्ज्ञ) यांचे मार्गदर्शन लाभले.
या सत्रामध्ये डॉ. जाकेर पटेल, डॉ. शहनवाज लोहारे, डॉ. भीमराव पवार, डॉ. बिराजदार भाऊसाहेब, डॉ. विनोद जाधव, डॉ. फिरोज रोजेवाले, डॉ. शोएब जावेद सय्यद, डॉ. हौवेद काझी, डॉ. बिलाल पटेल, डॉ. माधव सूर्यवंशी, डॉ. जिलानी पटेल, डॉ. विनोद बिराजदार आणि डॉ. संदीप खानापुरकर या मान्यवरांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
धमाका ऑफर
अता मिळवा फक्त
₹ *51,000 मध्ये 11 वस्तु*
🔶 बेड
🔷फ्रिज
🔶 सोफा सेट
🔷ड्रेसिंग टेबल
🔶कूलर
🔷उशी गादी
🔶कपाट
🔷दुल्हन सेट
🔶2 ख़ूर्ची
🔷चौरंग पाटे
🔶 गादी
*सोबत एक कूपन ज्या मध्ये 251111 पर्यंत चे ईनाम*
पत्ता :जी एम इलेक्ट्रिनिक & फर्नीचर, लातूर रोड CNG पेट्रोल पंप च्या पुढे, अलंदकर विट भट्टी समोर, औसा
संपर्क 8956515155
. 9175978989
. 9175086000
0 Comments