दैनिक यशशिद्धी.. चे इंदापूर प्रतिनिधी विश्व 24 न्युज चे वृत्त संपादक अतुल सोनकांबळे . याचेवर पोलीस प्रशासनाकडून खोटे गुन्हे करण्याचे षडयंत्र त्वरित थांबवा* *अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल*

 *दैनिक यशशिद्धी.. चे इंदापूर प्रतिनिधी  विश्व 24 न्युज चे वृत्त संपादक अतुल सोनकांबळे . याचेवर  पोलीस प्रशासनाकडून  खोटे गुन्हे करण्याचे षडयंत्र त्वरित थांबवा* 
*अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल*   
 *भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष  लक्ष्मण कांबळे लातूर*



 लातूर प्रतिनिधी:-
 
 पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव  येथील  अतिक्रमण धारक नागरिकांची व इंदापूरचे तहसीलदार याचेत शाब्दिक बाचाबाची झाली असता अधीकचा पोलीस बंदोबस्त  मागवून   त्या ठिकाणची  घरे तहसीलदार यांचा आदेश नसताना ही पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी बळाचा वापर करून पडण्याचे आदेश दिल्यानंतर तिथे गोंधळ उडाला व लहान मुले वडीलधारी माणसे महिलांना  मारहाण  झाल्याचे समाजमाध्यमावर  त्या ठिकाणचे व्हिडिओ प्रसारित झाले तेव्हा त्या ठिकाणी  आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा पत्रकार अतुल सोनकांबळे हे तेथील परिस्थितीचा आढावा घेवून तेथील वृत्तांकन.करून  अतिक्रमण धारकांना न्याय मिळावा म्हणून बातमी प्रसारित  केली म्हणून  पोलीस निरीक्षक  सूर्यकांत कोकने  यांनी सुबुद्धीने व पोलिसांच्या विरोधात बातम्या  प्रसारित का करतो असा राग मनात धरून पत्रकार यांना  टार्गेट करत आहेत. असे पत्रकार आतुल सोनकांबळे यांना  खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा मानस आहे असे निवेदनात म्हटले आहे. विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाल्याने. पोलिस निरीक्षक इंदापूर सूर्यकांत कोकणे यांनी  पारधी समाजातील महिलांना व लहान मुलांना मारहाण झाल्याचे व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत असताना ही  बाहेरील गावातील  महिलांना पोलीस स्टेशनला बोलाऊन घेऊन  पोलिसांकडून मारहाण झाली नाही असे  दबावाखली अर्ज  लिहून घेऊन  पत्रकार अतुल सोनकांबळे यांनी बातमी केलेली खोटी आहे .असा अर्ज लिहून घेतला आहे. 
अतुल सोनकांबळे  यांना पोलीस प्रशासन बौद्ध समाजाचे पत्रकार असल्याने  त्यांना  टार्गेट करून विनाकारण  खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे तरी  माननीय मुख्यमंत्री साहेब आपण या प्रकरणात स्वतः जातीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी .असे  भीम आर्मीचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष यांनी निवेदनात  मागणी केली आहे
(पत्रकार हा एक समाजाचा आरसा असून. त्यांच्या वरच खोटे गुन्हे दाखल करून त्यांची प्रतिष्ठा मलिन करणे हे कितपत योग्य आहे आणि मग पत्रकारांनी पत्रकारिता करावी का नाही???? हा प्रश्न सर्व पत्रकरा पुढे एक आव्हान  उभे राहिले आहे 
म्हणून आम्ही आपणास पत्रका द्वारे कळवत आहोत अन्यथा  आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल सर निवेदनाची  तात्काळ  दखल घेवून इंदापूरचे संबंधित  पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी खोटे व बनावट गुन्हे दाखल  न करण्याचे   कळवावे
अन्यथा भिम आर्मी संघटनेच्या वतीने लवकरच तिव्र व उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहोत यावेळी निवेदनावर भीम आर्मीचे जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे,भीम आर्मी लातूर जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे, भीम आर्मी औसा तालुका प्रमुख  सिद्धार्थ कांबळे आदी भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी आहेत

Post a Comment

0 Comments