आशा भोसले यांच्या स्मरणार्थ 'अभी ना जाओ छोडकर...'
मोहम्मद अयाज यांचा स्वरांजली कार्यक्रम संपन्न
सोलापूर- महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर उर्दू घर व भारतीय कला प्रसार अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मविभुषण स्व. आशा भोसले यांच्या स्मरणार्थ आयोजित गाण्यांच्या मैफली स्वरांजली गायक मोहम्मद आयाज, गायिका आस्था लोहारे यांनी सादर केलेल्या "अभी ना जाओ छोडकर" हे कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर येथे संपन्न झाला.
प्रारंभी मंजूषा गाडगीळ यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, लायन्स क्लबचे गर्व्हनर एम. के. पाटील, प्रसिध्द डॉ. मिलिंद जोशी, गायक मोहम्मद अयाज, गायिका आस्था लोहारे, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी उर्दू घरचे प्र. व्यवस्थापक साहीर नदाफ व उर्दू घर सांस्कृतिक समितीचे सर्व सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते.
हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित कार्यक्रमास 'अभी ना जाओ छोडकर, ये दिल अभी भरा नहीं..' या गाण्याला रसिकांनी मोबाईलचा टॉर्च लावून अशी दाद दिली. त्यानंतर 'इशारो... इशारो में दिल देनेवाले...' यासह एकापेक्षा एक सुंदर गीतांच्या सादरीकरणामुळे आशाताईंच्या गाण्यांची आठवण रसिकांना झाली. 'दिवाना हुआ बादल... सावन घटा की घटा...' या गाण्याला श्रोत्यांनी टाळ्यांचा दाद दिली. मांग के साथ तुम्हारा. तोरा मन दर्पण केहलाय अशा वेगवेगळ्या गीतांसह आशाताईंच्या एकापेक्षा एक सुंदर व अवीट गाण्यांनी सभागृह चैतन्याने बहरला होते.
यावेळी वाद्यवृंद संगीत संयोजन अविनाश इनामदार, साहिर नदाफ, गायिका भाग्यश्री चव्हाण, डॉ. निलरोहित पैके सहभागी झाले होते. मंजूषा गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. मोहम्मद अयाज यांनी जिल्हाअधिकारी कार्तिकेयन व प्रांत आधिकारी सदाशिव पडदुणे यांचे आभार व्यक्त केले.

0 Comments