*उमरगा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त राहत चॅरिटेबल ट्रस्ट वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप*
मुरूम/प्रतिनिधी
उमरगा :भारतीय स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असतानाच, उमरगा शहरात 'राहत चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना बिस्कीट, केळी, पिण्याचे पाणी आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
ट्रस्टच्या सदस्यांनी घेतलेल्या या उत्स्फूर्त पुढाकारामुळे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
व तसेच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणाऱ्या या सामाजिक उपक्रमाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतील प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून ट्रस्टच्या पाठीशी पाठबळ उभे केले.उपस्थित
या प्रसंगी विधानपरिषद आमदार बसवराजजी पाटील माजी खासदार रवींद्रजी गायकवाड माजी पंचायत सभापती जितेद्र दादा शिंदे उमरगा नगराध्यक्ष किरणजी गायकवाड पंचायत समिती सभापती आकांक्षा ताई चौगुले उपनगराध्यक्ष विजयभैय्या वाघमारे नगरसेवक: सचिन जाधव, शफी चौधरी इतर या मान्यवरांचा राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सत्कार करण्यात आला
कैलासजी शिंदे, डॉ. कपिलजी महाजन यांसह परिसरातील नागरिक व विविध क्षेत्रांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष परिश्रम हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राहत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जाहेद मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली वसीम लदाफ, खलील शेख, साजिद लदाफ, सर्फराज बागवान, अमजद मणियार, अझहर शेख, मनझुर शेख, मुस्तफा लदाफ, वशीम बागवान, मुस्तफा कारभारी, पाशा मुल्ला, हाफिज समीर साब, हाफिज संगीरसाब, अमजद मौलाना, अशपाक शेख आणि ॲडव्होकेट भैया शेख यांच्यासह
ट्रस्टच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.स्वातंत्र्यदिनाच्या या प्रसंगी राहत चॅरिटेबल ट्रस्टने दाखवलेल्या या सामाजिक भान आणि कौतुकास्पद उपक्रमाचे संपूर्ण उमरगा शहरातून व सर्व स्तरातून जोरदार स्वागत व अभिनंदन होत आहे.


0 Comments