होप फाउंडेशन तर्फे 200 हुन जास्त किट व ईतर साहित्याची मदत पुरग्रस्त भागात पोहोच
उस्मानाबाद अल्ताफ शेख रिपोर्टर
होप फाउंडेशन मदतीसाठी सदैव तत्पर. आज उस्मानाबादकरांतर्फे 200 हुन जास्त किट व ईतर साहित्याची मदत पुरग्रस्त भागात होप फाउंडेशनच्या माध्यमातुन पोहोच झाली आहे. ! या मदतकार्यावेळी जवळवाडीच्या स्थानिक प्रशासनाने अमुल्य मदत केली. हे विशेष यामध्ये जवळी (मेढा) SDM (प्रांत अधिकारी) सोपान टोंपे साहेब. BDO सतिष बुध्दे साहेब, तहसिलदार पोळ साहेब यांनी सह्याद्रिनगर,पाटनेमाची,कोळघर,झोरेवस्ती, गाळदेव या प्रमुख निर्गम भागात स्वतः दिवसभर होप फाउंडेशनची आपत्तीग्रस्त कुटुंबीयांना मदत पोहोच करण्यास अत्यंत मोलाची मदत केली. मांटी येथे ग्रामस्थांतर्फे होप फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचा मनीषा वाघमारे,शाहनवाज़ सय्यद,रणजीत महाडिक, प्रसाद मुंडे, व उज्ज्वल भिंगारे यांचा सत्कार करन्यात आला.
अल्लाह ह्या आपत्तीतुन ह्या दुखाःतुन पुरग्रस्त बांधवांना लवकरच मुक्त कर यांची मदत कर व यांचे जिवन प्रकाशमय कर असी प्रार्थना ही केली.
0 Comments