राज्य सरकारने आता शेत जमिनीचे तुकडे पाडून त्याची खरेदी - विक्री करण्यावर काही नवीन नियम लागू केले आहेत,शेत जमीन खरेदी - विक्रीच्या नियमामध्ये बद्दल ! - शेकऱ्यांसाठी खूप महत्वाचे
अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद
राज्य सरकारने आता शेत जमिनीचे तुकडे पाडून त्याची खरेदी - विक्री करण्यावर काही नवीन नियम लागू केले आहेत - या नियमानुसार आता जमिनीचे गुंठ्यात तुकडे पाडून खरेदी - विक्री करता येणार नाही
मात्र खरेदी किंवा विक्री करायची असेल तर त्यासाठी सक्षम प्राधिकरण किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल
काय सांगितले राज्य सरकाने ?
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार - समजा एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर असेल आणि सर्व्हे नंबरमधील एक, दोन किंवा तीन गुंठे जागा तुम्ही विकत घेणार असाल तर, त्याची दस्त नोंदणी होणार नाही
त्यासाठी त्या सर्व्हे नंबरचा ले-आऊट करून त्यात गुंठ्यांचे तुकडे जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागेल - तसेच अशाच ले-आऊटमधील गुंठ्याने विकत घेतलेल्या जमिनीच्या व्यवहाराची नोंदणी होणार आहे
तसेच यापुर्वीच एखाद्या शेतकऱ्याने कमी तुकडयाची जमीन खरेदी केली असेल तर - अशा तुकडयाच्या खरेदी विक्रीसाठी व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत 2015 कायदयातील कलम 8 नुसार परवानगी आवश्यक आहे
दरम्यान एखाद्या जमिनीचा भूमी अभिलेख विभागामार्फत हद्दी निश्चिती होऊन मोजणी नकाशा देण्यात आला असेल - तर अशा तुकड्याने खरेदी -विक्री केलेल्या जमिनीसाठी ही परवानगी आवश्यक राहणार नाही
*शेत जमीन खरेदी - विक्रीच्या* - नियमामध्ये बद्दल झाले हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी , नक्कीच खूप महत्वाची आहे.
0 Comments