लातूर शहरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण बाबत
लातूर,दि.29(जिमाका) सरकारी तसेच खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार दि. ०५ सप्टेंबर २०२१ रोजी पर्यंत कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण करणे बाबत राज्यस्तरावरून सुचना देण्यात आलेल्या आहेत.
तरी यास अनुसरून लातूर मनपामार्फत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या लसीकरणासाठी विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
वार दिनांक लसीकरणासाठीचे केंद्र सोमवार 30.08.2021 सरस्वती विदयालय प्रकाश नगर,मंगळवार 31.08.2021 देशीकेंद्र विदयालय सिग्नल कॅम्प, बुधवार 01.09.2021 शिवाजी विदयालय, लेबर कॉलनी,गुरुवार 02.09.2021 केशवराज विदयालय शाम नगर, शुक्रवार 03.09.2021देशीकेंद्र विदयालय सिग्नल कॅम्प, शनिवार 04.09.2021 केशवराज विदयालय शाम नगर.
प्रत्येक लसीकरण केंद्राच्या ठिकाणी त्या त्या परीसरात असलेल्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी लसीकरण करुन घ्यायचे आहे. याचे शाळानिहाय नियोजन गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, लातूर यांचे कार्यालयाव्दारा करण्यात आलेले आहे.
तरी शहरातील पहिला डोस अदयाप न घेतलेल्या व तसेच ज्यांना पहिला डोस घेवून दुस-या डोससाठीचा विहित कालावधी पुर्ण झालेला आहे त्यांनी आपल्या शाळेसाठी निश्चीत करण्यात आलेल्या लसीकरण केंद्र येथे वरील वेळापत्रकानुसार लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
0 Comments