गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवारी (दि.१० ऑगस्ट)रेणापूर येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन


 


रेणापूर/प्रतिनिधी:भाई गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवारी (दि.१० ऑगस्ट)रेणापूर येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

   शेकापचे ज्येष्ठ नेते,

महाराष्ट्राच्या राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व,एकाच मतदारसंघातून,एकाच पक्षातून विक्रमी ११ वेळा आमदार झालेले,अभ्यासू, संयमी व विशेषतः राजकारणातील  'जनसामान्यातील माणूस' म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी नुकतेच निधन झाले.या व्यक्तिमत्वास रेणापूर तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मंगळवार दि.१० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता,रेणुका देवी मंदिर सभागृह ,रेणापूर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्वपक्षीय शोकसभेस सर्व राजकीय पक्ष

संघटना,संस्थाचे पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments