शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा औसा तालुक्यात गाव भेट दौरा
औसा / तालुक्यातील
#शिवणी बु, भुसनी , लोदगा , होळी , कवठा येथे गावास भेट देऊन गावांतील विकास कामासंदर्भात व नागरिकांच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्याबाबत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी चर्चा केली.
यामध्ये प्रामुख्याने गावातील व शेतातील लाईट प्रश्न सोडवण्यासाठी अतिरिक्त लोड असलेल्या डिपी वर नविन डिपी चे प्रस्ताव तयार करावेत. तसेच महावितरण विभागाने वसुली साठी गावोगावी सोयाबीन निघाल्यानंतर कॅम्प आयोजित करावेत. शेतकऱ्यांनी विज बिल भरणा करून महावितरण विभागास सहकार्य करावे असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.
आपल्या ग्रामीण गावात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता असून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सहकार्याने शेत रस्ते मोकळे करावेत. व शेत रस्ते MRGES मधून घेऊन कामे पूर्ण करावेत.
गावातील निराधार नागरिकांच्या पगारीसाठी तलाठी यांनी फॉर्म भरून घेण्यात यावेत. निराधार वंचित राहिल्यास संबंधित तलाठी जबाबदार राहातील.
तसेच पिक कर्ज, शेत रस्ते, गाव जोड रस्ते, पाणंद रस्ते, कृषी, अशा विविध समस्या प्रशासकीय अधिकाऱ्यांस सोडवण्याबाबत सूचना केल्या. ग्रामस्थांस समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना मा जिल्हा प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद अण्णा आर्य , युवासेना जिल्हा प्रमुख कुलदीप सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, युवासेना उपजिल्हाप्रमुख दिनेश जावळे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तालुका कृषी अधिकारी ढाकणे सर, नायब तहसीलदार, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, ईश्वर पाटील, उपतालुका प्रमुख किशोर भोसले, श्रीधर साळुंके, महेश सगर, चंदू आणा तळेगाव, श्रीराम कुलकर्णी, संचालक मनोज सोमवंशी, वसतिगृह निरीक्षक सदस्य
विलास काळे, संजय गांधी निराधार कमिटीचे श्रीहरी काळे, मारुती मगर, अरविंद कोळपे, सरपंच सुरेश मुसळे, अजित सोमवंशी, रणजित कोळपे , ऋषिकेश पाठवदकर, आकाश सितापुरे, आदी सह
तालुका स्तरावरील सर्व शासकीय अधिकारी, तालुक्यातील युवासेना, शिवसेना पदाधिकारी तसेच गावातील वडीलधारी थोर मंडळी , सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments