स्थानिक गुन्हे शाखा, लातूरच्या पथकाचा उदगीर शहरात जुगार अड्ड्यावर छापा ,,. 1लाख 48000 रु च्या मुद्देमालासह 14 आरोपींना अटक*

 *स्थानिक गुन्हे शाखा, लातूरच्या पथकाचा उदगीर शहरात जुगार अड्ड्यावर छापा ,,. 1लाख 48000 रु च्या मुद्देमालासह 14 आरोपींना अटक*





रिपोर्टर न्यूज़ बीयूरो 

               या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपाधीक्षक (गृह) श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात लातूर जिल्ह्यामधील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा चे अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

                

                         सदर पथक जिल्ह्यामधील अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना पथकास मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली की, उदगीर शहरातील आडत लाईन येथील बलभीम नाईक यांच्या मालकीच्या एका इमारतीमधील बंद रूम मध्ये अविनाश गायकवाड हा तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत आहे. अशी माहिती मिळाली.

              त्या आधारे पोलीस स्टेशन उदगीर (शहर) हद्दी मधील अडत लाईन येथील बलभीम नाईक यांचे मालकीचे इमारतीमधील एका रूम मध्ये अविनाश गायकवाड हा जुगाराचा क्‍लब चालवीत असताना मिळून आला. त्यासोबत इतर 13 जन बेकायदेशीर रित्या स्वतःचे फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लावून  तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना आढळून आले. त्या सर्वांची झडती घेतली असता त्यांचेकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 1,48,000/- मुद्देमाल मिळून आला तो जप्त करण्यात आला आहे. तसेच जुगार खेळत व खेळवीत असलेले इसम नामे


1) अविनाश रामराव गायकवाड,वय 29 वर्ष ,राहणार-चांभार सोसायटी, उदगीर.


2)मनोज रमेश बीबराळे, वय 20 वर्ष, राहणार-हनुमान कट्टा,उदगीर.


3) सुभाष शिवराज काळे,वय 28 वर्ष,  राहणार-शेतकार गल्ली, चौबारा रोड , उदगीर.


 4) प्रसाद काशिनाथ तानशेटे, वय 25 वर्ष, राहणार-सराफा लाईन, चोबारा, उदगीर.


5) मारुती रामांना वरदाडे, वय 24 वर्ष, राहणार- विकास नगर, उदगीर.


 6) विशाल सूर्यकांत हिप्पळगे, वय 24 वर्ष, राहणार- हनुमान कट्टा, उदगीर.


7) मारोजी नागू सोमवंशी, वय 45 वर्ष, राहणार निडेबन, उदगीर.


8) बाळू टिकाराम राठोड, वय 46 वर्ष, राहणार-मल्लापुर ता. उदगीर.


 9) सुरेश रामचंद्र आलमकीरे,  वय 35 वर्ष , राहणार-हनुमान कट्टा, उदगीर.


10) अक्षय अरविंद पाटील, वय 29 वर्ष, राहणार- शाहू चौक, शिवाजी सोसायटी उदगीर.


 11) संतोष शांतलिंग मठपती, वय 35 वर्ष, राहणार-बिदर गेट, उदगीर.


 12) गंगाराम नरसिंगराव मोरारीकर, वय 35 वर्ष, राहणार- रेल्वे स्टेशन, रोड उदगीर.


13) गणेश सोपानराव हंगरगे-पाटील, वय 26 वर्ष, राहणार- आनंद नगर. उदगीर.


14) प्रफुल हेमराज गजरा, वय 42 वर्ष , राहणार- बिदर नाका उदगीर.


             असे एकूण 14 इसम तिर्रट नावाचा जुगार खेळत खेळत असताना 1,48,000/- इतक्या  रोख रुपयाच्या मुद्देमालासह मिळून आल्याने त्यांचे विरोधात पोलीस ठाणे उदगीर शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 248 /2021, कलम 4,5, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास उदगीर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस हे करीत आहेत.

             सदरची कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखा, लातूर येथील सपोनि सुधीर सूर्यवंशी, पोलीस अमलदार नामदेव पाटील, खुर्रम काझी, बालाजी जाधव, यशपाल कांबळे, रवी कानगुले, जमीर शेख,  चालक सपोउपनि खान यांचा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments