महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त पालकमंत्रीअमित विलासराव देशमुख यांनी केले अभिवादन
लातूर,दि.2(जिमाका):- राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त लातूर शहरातील गांधी चौक येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे, श्रीशैल्य उटगे, ॲड. किरण जाधव, सुपर्ण जगताप, रमेश सूर्यवंशी, फारुक शेख, हकीम शेख, नगरसेवक रविशंकर जाधव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, व्यंकटेश पुरी, इम्रान सय्यद, बिबीशन सांगवीकर, अविनाश बट्टेवार, सुंदर पाटील कव्हेकर, मोहन सुरवसे आदीसह उपस्थित होते.
0 Comments