भादा पोलिसांचे तीन ठिकाणी छापे
शेख बी जी
औसा.दि.५ औसा तालुक्यातील भादा येथे ता.५ रोजी तीन ठिकाणी छापे टाकून अवैध दारू विक्री व जुगार खेळताना चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रथम
गुडगुडी जुगारावर छापा टाकला यात
आरोपी- सखाराम कृष्णा चव्हाण व किसन पांडुरंग चव्हाण, चोटू बळी जाधव सर्व रा. एकंबी तांडा.
हे गावामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये बसून बॅनर वर वरच्या बाजूस 1 ते 5 कप्पे व खालच्या बाजूस 6 ते 0 असे एकूण 10 कप्पे असलेल्या बॅनरवर गुडगुडी नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आले.त्यामध्ये एकूण रु.5,330- रोख व बॅनर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दुसऱ्या छाप्यात
आरोपी- दिलीप खेमराज चव्हाण हे पत्र्याचे शेडमध्ये हातभट्टी दारू 20 लीटर, किंमत रु.2000/- मlलासह मिळून आला.
तिसरा छाप्यात
आरोपी- धोंडीराम महादू जाधव हे शेतात हातभट्टी दारू 30 लीटर, किंमत रु.3000/- मlलासह मिळून आला.
मां. पो अधिक्षक व अपर पो अधिक्षक, व डी वाय एस पी कोल्हे सो. यांचे मार्गदर्शनाखाली , एपीआय विलास नवले, हेडकाॅनस्टेबल बंडू डोलारे,बापूसाहेब मंतलवाड,महेश चव्हाण, विठ्ठल दिंडे यांनी म्हत्वाची कामगिरी केली .
0 Comments