*वाळू तस्करांविरोधात स्वता.डायशिंगजिगर बाज तहसीलदार डॉ शैलजा पाटील नदीवर*
सांगली : प्रतिनिधी समीर तांबोळी
कडेगाव तालुक्यात वाळू तस्करी करणाऱ्या तस्करावर स्वता. तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी कडक कारवाई करीत वांगी येथे रविवार( दि 6 ) रोजी रात्री १ वाजता वाळूने भरलेला ट्रॅक्टर वाहनासह 1 ब्रास वाळू असा ८ लाखांचा मुद्देमाल जप्त केली.या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले गेले आहेत.
तालुक्यात येरळा नदीतून तालुक्यातील वांगी, शिवणी ,नेवरी, शेळकबाव ,रामापुर ,कान्हरवाडी, येतगाव तुपेवाडी, या गावातील हद्दीत मोठ्या प्रमाणात वाळु तस्करांनी उच्चाद मांडला आहे. येरळा नदीची वाळू सांगली जिल्ह्यासाह पश्चिम महाराष्ट्रात बांधकामास प्रसिद्ध आहे .याचाच फायदा घेत येथे वाळू तस्करी फोफावली आहे. याला आळा घालण्यासाठी महसूल विभागाची कारवाई सुरू आहे.
मागील काही महिन्यात बेकायदा वाळू वाहतूक केल्या प्रकरणी 27 वाहने पकडण्यात आली असून 39 लाख रुपयांची दंडतात्मक करावाई करण्यात आली असून 6 लाख 57 हजार इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी दिली .तालुक्यातील वांगीसह, शेलकबाव , नेवरी , वडियेरायबाग या गावात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
तालुक्यात कोणत्याही प्रकारे अवैध मुरूम उत्खनन व वाळू तस्करी आणि वाहतूक खपवून घेतली जाणार नाही . महसुल विभागातील तलाठी व पोलीस प्रशासनास तस्करांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील काही महिन्यात अवैध गौण खनिज मधील पाच प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नदी पाञातही चरी खाणण्यात आल्या असून कोनाचीही गय केली जाणार नाही.असे तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी सांगितले.
- 1) पोलिस कुठे असतात ?-
चिंचणी आणि कडेगांव पोलिस ठाण्यांची रात्रभर गावोगावी गस्त असते. त्यांनाही वाळूचोरीची वाहने कशी आढळून येत नाहि. याबद्दल शेतक-यांत आश्चर्य आहे.
कोट..
चोरीची वाळु कोनीही खरेदी करु नये तसेच गावा गावातील वाळु साठ्याचे पंचनामे करण्याचेही आदेशही तलाठ्यांना देण्यात आले आहेत. ज्यांच्या घराजवळ विना परवाना वाळू सापडेल त्यांच्या वर फोजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल
डॉ शैलजा पाटील
तहसीलदार
0 Comments