उस्मानाबादचे म.खिजर मोरवे, आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 

 उस्मानाबादचे म.खिजर मोरवे, आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित







 लातूर (म.मुस्लिम कबीर) उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुका लोहारा पंचायत समितीच्या 36 शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने शनिवारी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.कोरोना महामारीमुळे मागील 2 वर्षांपासून वितरण पुरस्कार सभा होत नसल्याने यावेळी गेल्या तीन वर्षातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.  सभेच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांभ होत्या.यावेळी उपसभापती व्यंकट कोरे, माजी जि.प.सभापती चंद्रकला नारायणकर, गटशिक्षणाधिकारी टी.एच.सय्यद उपस्थित होते۔
      यावेळी मौजे बेलवाडी ता.लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक म. खिजर मोरवे यांना सन 2020 चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.मोहम्मद खिजर मोरवे हे शैक्षणिक उपक्रम आणि विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे शिक्षण पद्धतीत परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांना यापूर्वी महात्मा ज्योतीबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार,लोकमंगल फाऊंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार,अल्पसंख्यांक संघटने शिक्षक पुरस्कार आणि आयआयएम अहमदाबादच्या सर फाउंडेशनने दिलेला प्रतिष्ठित आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे.
     पुरस्कार मिळाल्यावर मोहम्मद खिजर मोरवे यांचे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व प्रशासकीय संघटना तसेच मित्रपरिवार व नातेवाईकांनी अभिनंदन करून आनंद व्यक्त केले आहे.

MD.MUSLIM KABIR,
Latur Distt. Correspondent,
URDU  MEDIA 
Cell- 09175978903/8208435414

Post a Comment

0 Comments