गुरुजनांच्या संस्कारामुळे मुले घडतात: सूर्यकांत कदम* :*शेळकबाव हायस्कूल मध्ये एस एस सी मार्च २०२२चा शुभचिंतन सोहळा संपन्न

 *सांगली जिल्हा प्रतिनिधी समीर तांबोळी*

*




गुरुजनांच्या संस्कारामुळे मुले घडतात: सूर्यकांत कदम* 

:*शेळकबाव हायस्कूल मध्ये एस एस सी मार्च २०२२चा शुभचिंतन सोहळा संपन्न*


 विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थी दहावीनंतर जीवनात कलाटणी मिळते यासाठी गुणवत्ता अपेक्षित असते. उच्च प्रतिची गुणवत्ता प्राप्त करणे आवश्यक आहे यासाठी शिक्षकांनी दिलेल्या संस्कार व मार्गदर्शनामुळे आपल्याला आवडीची क्षेत्रानुसार आपलं नाव करता येते त्यामुळे गुरुजनांचे अभिनंदन केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे सूर्यकांत कदम यांनी केले.


 ते शेळकबाव ( ता.कडेगांव) येथे एस एस सी शुभचिंतन सोहळा प्रसंगी बोलत होते. यावेळी पोपट कदम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.


प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व अँड आ. कै.संपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांचे विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गाऊन त्यांचे स्वागत केले. तसेच २०२० व २०२१ चे बक्षिसे वितरण करण्यात आले.


           पुढे सूर्यकांत कदम म्हणाले, की सध्याची युग स्पर्धेचे आहे त्यामुळे मुलांनी काळाप्रमाणे बदल केला पाहिजे .आपले शिक्षक, पालक आपल्या पाठीशी ठाम उभी असतात.माझी शाळा, माझी माती, माझे गाव, माझे शिक्षक यांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.


  यावेळी पोपट कदम कदम म्हणाले, की मुलांनी आपला आदर्श शोधायला हवा तसेच स्वप्न बघायला शिकवताना ती स्वप्न सत्यात उतरत त्यांना जगायला शिकवले पाहिजे. मुलांनी मनात आणलं तर सर्व शक्य आहे यासाठी मुलांनी वेळेचे नियोजन केले तर आपल्या शेळकबाव शाळेची शंभर टक्केची परंपरा जपेल. शाळेचे नाव, गावाचे नाव, आई वडिलांचे नाव उज्वल करायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही.


      यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत निकम, शिक्षक राकेश तिरमारे तसेच विद्यार्थ्यांनी साक्षी खबाले, दीक्षा कदम ,दिव्या कदम यांनी मनोगत व्यक्त केले.


      यावेळी भीमराव कदम,सूर्यकांत पाटील, दुर्योधन यादव ,बबन कदम, विष्णू कदम, सचिन कदम, रावसाहेब कदम, उत्तम कदम, विठ्ठल कदम ,राजू महाडीक ,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक निकम सर, सचिन कदम, हिंदुराव कदम तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचलन एम. टी. जाधव यांनी केले तर आभार उत्तम सुपने यांनी मांडले.



*फोटो ओळ* :शेळकबाव (ता.कडेगाव) येथील एस एस सी मार्च २०२२चा शुभचिंतन सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुणे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी समवेत

Post a Comment

0 Comments