जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित बँक मेळाव्यात बचतगटांना 7 कोटी 81 लाख रुपये कर्जाचे वितरण • ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

 जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित बँक मेळाव्यात बचतगटांना 7 कोटी 81 लाख रुपये कर्जाचे वितरण


• ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान







लातूर, दि. 08 (जिमाका) : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित स्वयंसहाय्यता समूहांना आर्थिक सक्षम करून गटातील महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढ करण्याच्या उद्देशाने बँक कर्जाचा पुरवठा करण्यात येतो. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित बँक मेळाव्यात जिल्ह्यातील 334 बचतगटांना 7 कोटी 81 लक्ष रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्राप्त कर्जाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या बचतगटांच्या उत्पादनाचे  आकर्षक पॅकेजिंग, लेबलिंग करून कायमस्वरूपी उद्योगाची निर्मिती करावी, आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त बचतगटातील महिलांनी भरड धान्यापासून विविध पदार्थांची निर्मिती करावी. यासाठी सर्व बँकांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पीएमएफएमई इत्यादी शासकीय योजनांचे यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी  कृतिसंगंमच्या माध्यमातून कर्ज वितरण करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोयल यांनी यावेळी केले. 


यावेळी शासनाच्या लिंग समभाव जाणीव जागृती चित्ररथाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर याच्या हस्ते झेंडी दाखवून करण्यात आले. 


यावेळी उत्कृष्ट बँक सखीचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यावेळी ‘हर घर नर्सरी’ या उपक्रमाचा डेमो प्लॉटच्या माध्यमातून महीलांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बिया लावून शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत दत्तात्रय गिरी यांनी उपस्थित महिलांनी ग्रामीण भागात नर्सरीची निर्मिती करून पर्यावरण संवर्धनांस हातभार लावावा असे आवाहन केले.


यावेळी प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी उपस्थित महिलांना महिला दिनानिमत्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अनंत कसबे यांचा सेवानिृत्तीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मेळाव्यास स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक भास्कर मनी  व बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक श्री. जोशी उपस्थित होते. या बँक मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार यांनी केले, जिल्हा व्यवस्थपक अनिता माने यांनी आभार मानले. सूत्रसंचालन शीतल जगताप यांनी केले. या मेळाव्यासाठी सर्व तालुका अभियान व्यवस्थापक बँक सखी, सर्व प्रभाग समन्वयक, सर्व तालुका व्यवस्थापक हे उपस्थित होते. या मेळाव्याचे यशस्वी नियोजन जिल्हा व्यवस्थापक भगवान कोरे, पांडुरंग जेटणुरे व वैभव गुराले यांनी केले.

*****

Post a Comment

0 Comments