महिला दिनानिमित्त खरोसा येथे आज महिला सक्षमीकरण मेळावा

 महिला दिनानिमित्त खरोसा येथे आज महिला सक्षमीकरण मेळावा 





औसा प्रतिनिधी


 आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आज बुधवार दि 8 मार्च रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरोसा ता औसा येथे सकाळी 11 वाजता महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांच्या हस्ते व संयोगिता जाधव सरपंच खरोसा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश कामतकर शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र ,सुरेखा मुळे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लामजना, ॲड बाबुराव मोरे अध्यक्ष श्री संगमेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्था आणि सुनीता गिरवलकर उपाध्यक्ष श्री संगमेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्था आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या महिला सक्षमीकरण मेळाव्यामध्ये महिलांच्या आरोग्याबाबत तसेच महिलांना लघु व कुटीर उद्योगाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक बळकटी व्हावी म्हणून विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तरी खरोसा व परिसरातील महिला मंडळ बचत गट सदस्य तसेच लघु व कुटीर उद्योग करू इच्छिणाऱ्या महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सक्षमीकरण मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन गंगासागर राऊतराव चेअरमन सावित्रीबाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्था व प्रा दत्तात्रेय सुरवसे अध्यक्ष ग्रामीण जनता शिक्षण संस्था यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments