दुपारच्या बातम्या
शेतकऱ्यांच्या आत्महत्या राष्ट्रीय आपत्ती असल्याने आर्थिक आणीबाणी घोषित करा
- ललित पाटील बहाळे
लातूर/प्रतिनिधी:आर्थिक परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत.यामुळे देशात आर्थिक आणीबाणी घोषित करावी,अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे पाटील यांनी केली.
१९ मार्च १९८६ या दिवशी चिलगव्हाण (ता. महागांव जि.यवतमाळ) या गावचे सरपंच राहिलेले,माळकरी,संगीतातील तज्ज्ञ,शेतकरी ग्रहस्थ साहेबराव करपे पाटील यांनी आपल्या चार लहान मुलाबाळांसह आणि बायकोसह आत्महत्या केली. नोंदली गेलेली ही पहिली आत्महत्या. त्या घटनेला आता ३७ वर्षे होतील.त्यानंतर देशात साडेचार लाखावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.आजही दररोज सरासरी ४५ शेतकरी गळफास आपलासा करत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत.या घटनांमुळे आम्ही व्यथित आहोत.ही राष्ट्रीय आपत्ती आहे असे आम्ही मानतो.हा सरकारच्या शेतकरी विरोधी नितीचा परिणाम आहे.या गंभीर विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी १९ मार्च या दिवशी देश विदेशातील अनेक संवेदनशील नागरिक उपवास करत असतात. शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही यात सहभागी होतात.या वर्षी १९ मार्च या दिवशी शेतकरी संघटनेने मोठ्या प्रमाणात या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.प्रत्येक जिल्ह्यात सर्व कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी उपवास करावा.सरकारने शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती समजून आर्थिक आणीबाणी घोषित करावी अशा प्रकारची सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला देण्यात येईल.शेतकरी आत्महत्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी सर्व संवेदनशील नागरिकांनी उपवास करावा,असे आवाहनही शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित पाटील बहाळे यांनी लातूर येथे झालेल्या शेतकरी संघटनेच्या जिल्हा बैठकीत केले.
शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते अनंत देशपांडे यांच्या नेतृत्वात १९ मार्च पासून लातूर जिल्ह्यात शेतकरी परिक्रमा सुरु करण्यात येणार आहे.ही परिक्रमा जिल्ह्यातील ३०० गावातून जाईल.जिल्ह्यातील त्या- त्या भागातील कार्यकर्ते वेगवेगळ्या वेळी परिक्रमेत सहभागी होतील.
परिक्रमा पानगाव येथून निघेल. 18 जून पर्यंत तीन महिने ही परिक्रमा निघणार आहे. परिक्रमेची पूर्वतयारी करण्यासाठी ललित पाटील बहाळे लातूरला आले होते.
सरकारने संघटनेचे म्हणने ऐकले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीस शेतकरी संघटना न्यासाचे सदस्य अनंतराव देशपांडे, ग्रामीण साहित्यिक डॉ. शेषराव मोहिते,रमेश चिल्ले, मराठवाडा प्रमुख रामजीवन बोंदर,उच्चाधिकार समितीचे सदस्य माधव मल्लेशे,माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील,
माधवराव कंदे,पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष अशोक पाटील शेळगावकर,पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष अध्यक्ष बाबाराव पाटील,संपर्कप्रमुख मदन सोमवंशी,शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष वसंत आबा कंदगुळे,औसा संपर्कप्रमुख कल्याणआप्पा हुरदळे,विवेक पाटील,संघटनेचे ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र सलगरे,शंकर नीला, रेणापूर युवा आघाडीचे अध्यक्ष समाधान क्षीरसागर,पंडित पटवारी,नंदकिशोर आळंदकर, करण भोसले,जनार्धन डाके, गोविंद भंडे,माधव सोनवणे यांच्यासह लातूर जिल्हा शेतकरी संघटनेतील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
.....।।......................................
जागतिक महिलादिना निमित्ताने ज्ञानप्रकाश मध्ये ‘कडेकोट कडेलोट’ नाट्य प्रयोगाचे आयोजन
ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प आणि दिशा लातूर यांच्या वतीने महिलादिनानिमित्त नरहरे लर्निंग होममध्ये ‘कडेकोट -कडेलोट’ या एकपात्री नाट्यप्रयोगाची विशेष भेट ज्ञानप्रकाशच्या महिला पालक व नाट्यप्रेमींना मिळाली.
भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र आणि सर्जन शाळा प्रस्तुत , टायनी टेल्स निर्मित कडेकोट-कडेलोट हे नाटक स्रीच्या भाव-भावना , मनावर होणार्या असंख्य आघाताने उमटणार्या जखमांची, उचंबळून वाहणार्या भावनांच्या कल्लोळांची गोष्ट आहे.
स्त्री आपल्या मालकीची वस्तू आहे , हा समज जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी समाजमनाच्या इतका खोल रुतून बसलेला आहे; की त्यातून स्त्रियांना कडेकोट बंदिस्त करून ठेवलं जातं त्यातून होणारा अन्याय ,शोषण, त्रास हा स्त्रियांना संयमाची परीक्षा द्यायला लावतो आणि मग या संयमाचा कधीतरी कडेलोट होतोच.
स्त्रियांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय या प्रयोगातून मांडला गेला . स्त्रीच्या मनाची जाणीव जेव्हा होते तेव्हा लक्षात येते तिच्या घालमेलीची, विचारांच्या वादळांनी होणार्या तिच्या फरफटीची. चुकवता येणारच नाही असे रोजचे काम ती सहज हसत हसत करत रहाते... पण जेव्हा ती हक्कासाठी उठाव करते तेव्हा तिच्यातील आदिशक्तीचा जागर झालेला दिसतो .
मूळ इटालियन असलेले हे नाटक कल्पेश समेळ यांनी दिग्दर्शित केले आहे तर मराठी रूपांतरण अमोल पाटील यांनी केले आहे. आपल्या अभिनयाने हसता - हसता अंतर्मुख होण्यास भाग पाडणारी, संवादातून अंगावर सरसरून काटा उभी करणारी प्रतीक्षा खासनीस ही नाटकाची एकमेव कलाकार. तिने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवले, डोळ्यात हसू आणि आसू कधी आले ते कळलेच नाही . प्रत्येकिला ती माझीच गोष्ट वाटावी इतकी ही एकपात्री एकांकिका स्रीविषयक भावनांवर भाष्य करणारी झाली.
ज्ञानप्रकाशने आयोजित केलेल्या दोन्ही प्रयोगास महिला पालक व परिसरातील जवळपास 600 महिलांनी या नाटकाचा आस्वाद घेतला. त्याबरोबरच लातूरातील अनेक रंगकर्मीही उपस्थित होते.
यावेळी संजय अयाचित , धनंजय कुलकर्णी, डॉ. मुकुंद भिसे, प्रा.कांबळे, डॉ. संजय जोशी, डॉ. श्रीराम पाटील, सतीश नरहरे, सुनीता कुलकर्णी, डॉ. सुरेखा काळे, उमा व्यास, सविता नरहरे, डॉ. जयश्री जोशी, डॉ. अर्चना आपटे, अरूणा दिवेगावकर, प्रतिभा गोमसाळे, डॉ. लीला कर्वा, उर्मिला भांदरगे, शीतल गड्डीमे, असे अनेक रंगकर्मी, नाट्यकर्मी व नाट्यप्रेमी उपस्थित होते.
---------
तू बी रुजवणारी, तू झाडे लावणारी, तू झाडे जगवणारी, तू झाडांना मोठ करणारी, तू शहराचे सुशोभीकरण करणारी, तू जनप्रबोधन करणारी, तूच वृक्ष कन्या, तूच वृक्ष मैत्रीण, तूच शहराला हिरवागार साज चढविणारी, तूच ग्रीन लातूर वृक्ष टीमची सन्माननीय. तुला-तुझ्या कार्याचा सन्मान करणे हे आमचं आद्य कर्तव्य.
तुझा आम्हाला सार्थ अभिमान.
असे म्हणत ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी टीम मधील महिला सदस्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यापूर्वी आज जागतिक महिला दिनानिमित्त ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या महिला सदस्यांनी
राणी अहिल्याबाई होळकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
पर्यत हजारो झाडांना दोन टँकरद्वारे full पाणी दिले.
यावेळी
लातूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यां
वृक्षप्रेमी, प्रगतीशील शेतकरी सौ. आशाताई भिसे यांच्या शुभ हस्ते
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या ऍड वैशाली लोंढे, दीपाली राजपूत, मनीषा कोकणे, कल्पना कुलकर्णी, पूजा पाटील, विदुला राजमाने,दिक्षा चलवाड, नीता कानडे, पुष्पा कांबळे, तुळसा राठोड, प्रिया नाईक या महिला सदस्य
---------------
0 Comments