कस काय सरपंच बाई खर हाय काय?
बनावट शिपाईचे नियुक्ती पत्र दिले खरं हाय काय?
शिपाईचे बनावट नियुक्ती पत्र भोवले ग्रामसेवकाला.
औसा..... (प्रतिनिधी शिवाजी मोरे)शिवणी (बु)ता.औसा जि.लातूर येथील ग्रामपंचायत मध्ये विजय रमेश खराडे हा व्यक्ती संगणक चालक म्हणून कार्यरत आहे व या पदाची शासनाकडून पगार घेत आहे पण सरपंच व ग्रामसेवक यांनी सदर कर्मचाऱ्याशी संगणमत करून त्याच कार्यालयात शिपाई या पदाची जागा करीत असताना सदर रिक्त पदावर नियुक्तीसाठी कसलीच न्युज पेपर ला जाहिरात न देता व जाहीर प्रगटन नोटीस न डकवता व प्रोसिडिंग बुक मध्ये खाडाखोड करून सदर संगणक चालकाची शिपाई पदावर खोटी व बोगस नियुक्ती दाखवून शासनाची फसवणूक व भ्रष्टाचार केल्याने सदर शिपाई विरुद्ध कारवाई करून सेवेतून बडतर्फ करून गुन्हा नोंद करणे यासाठी अनेक वरिष्ठ अधिकारी यांना अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी पुराव्यासह तक्रारी अर्ज केल्यामुळे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) जिल्हा परिषद लातूर यांनी पुराव्याची व प्रकरणाची कसून चौकशी केल्याने सिद्ध झाले की ग्रामपंचायत शिवणी (बु.) येथील विजय रमेश खराडे यांची बेकादेशीर व बनावट नियुक्ती असल्याचे सिद्ध झाले या बनावट नियुक्तीस जबाबदार सरपंच श्रीमती शोभा धोंडीराम जाधव व ग्रामसेवक श्री.निरुडे एस.व्ही. हे आहेत असे निर्णय दिले.
अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समितीच्या तक्रारीची उपमुख्य कार्यकारी अधिकारीनी घेतली दखल.
मौजे शिवणी (बु.) ता.औसा येथील ग्रामपंचायत कर्मचारी नियुक्ती प्रकरणाचा चौकशी अहवाल एकंदरीत ग्रामपंचायत कर्मचारी विजय रमेश खराडे यांची ग्रामपंचायत शिपाई पदासाठी केलेली नियुक्ती बनावट दिसून येते.
निर्णय: ग्रामपंचायत कर्मचारी यांची नियुक्ती करत असताना ग्रामपंचायत कार्यालय शिवणी (बु.) ता.औसा जि.लातूर यांनी अधिनियमातील तरतुदीचे पालन न करता बनावट नियुक्ती केल्याचे सिद्ध होत आहे याबाबतीत सरपंच श्रीमती शोभा धोंडीराम जाधव व श्री निरुडे एस.व्ही. ग्रामसेवक हे जबाबदार आहेत.
0 Comments