*लातूर तालुका ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्षपदी लालासाहेब जाधव*
*लातूर*: तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ मर्यादित लातूरच्या अध्यक्षपदी लालासाहेब ज्ञानोबा जाधव व उपाध्यक्ष पुंडलिक सिताराम वंजारे यांची निवड झाली. लातूर रेणापूर कार्यक्षेत्र असलेला ह्या संघाची निवडणूक बिनविरोध झाली होती दिनांक 31/3/2023 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी पवार यु.ए. यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली, यात लालासाहेब ज्ञानोबा जाधव खुलगापूर यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्ष पदासाठी पुंडलिक वंजाटे यांना सहा तर मनोज भालके यांना पाच मते मिळाली. पुंडलिक वंजाटे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड घोषित करण्यात आली .या सर्व पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी सत्कार केला. यावेळी शिवसेना औसा तालुका प्रमुख सतिश शिंदे, संचालक दत्तात्रय मिरकले, हनुमंत कांबळे , गोविंद पोतदार, लक्ष्मण मोरे, शालिवान भंडे, ज्ञानेश्वर गोरडे , मनोज भालके, तानाजी वंजारे , शारदा व्यंकट भालके, गिरजाप्पा मिरकले, पद्माकर पोतदार , मनोज सोमवंशी, सुरेश मुसळे, अमोल रेड्डी, मुस्तफा सय्यद आदी उपस्थित होते.
0 Comments