शाश्वत विकासासाठी तयार होणार ‘जिल्हा विकास आराखडा’ •2030 पर्यंत शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्याचा मानस •6 मे रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन


शाश्वत विकासासाठी तयार होणार ‘जिल्हा विकास आराखडा

2030 पर्यंत शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्याचा मानस

6 मे रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन








लातूर, दि. 26 (जिमाका): भारताची अर्थव्यवस्था 2025-26 पर्यंत 5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे तसेच 2030 पर्यंत शाश्वत विकासाचे ध्येय सध्या करण्याचा भारत सरकारचा मानस आहे. याच अनुषंगाने शाश्वत विकासाच्या ध्येयांबाबत राज्य शासनाने 2023-24 पासून जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार लातूर जिल्हा विकास आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असून याबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुसिंग यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा विकास आराखडा तयार करताना जिल्ह्यातील संभाव्य संधी ओळखून, त्यामध्ये अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे सध्या ठरविण्यात येणार आहे. यासाठी विविध क्षेत्र व उपक्षेत्रांची निवड करण्यात येईल. या क्षेत्रातील तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींचा सहभाग, मार्गदर्शन घेण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हा आराखडा तयार करताना सध्याचे सकल जिल्हा उत्पन्न, त्यामध्ये पुढील पाच, दहा व पंधरा वर्षाच्या कालावधीत अपेक्षित असलेली वाढ यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून गुणात्मक सहाय्य प्राप्त करून घेतले जाणार आहे.

जिल्ह्याची सद्यस्थिती, जमेच्या बाजू, संधी, जिल्ह्याचे व्हिजन याबाबींचा विचार जिल्हा आराखडा तयार करताना होईल. जिल्ह्याच्या विकासासाच्या दृष्टीने मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना, तूर व सोयाबीन पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग, शिक्षण क्षेत्र आदी प्रमुख क्षेत्रांसह इतर उपक्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली आणि त्यादृष्टीने तयारीच्या संबंधित यंत्रणाना जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या. या अनुषंगाने 6 मे रोजी जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांची कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

                                                            ****


--


Post a Comment

0 Comments