रामनाथ विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
आलमला:- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला ता.औसा जि.लातूर येथे दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती विद्यालयात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम रामनाथ शिक्षण संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता पाटील, पर्यवेक्षक श्री पी. सी. पाटील, क्रीडा शिक्षक एल. पी. बिराजदार, रंगनाथ अंबुलगे प्रशांत हुरदळे, धाराशिवे शरण, भास्कर सूर्यवंशी, नरसिंग पंडगे सौ. हिंगणे जे.आर.तसेच विद्यायातील प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0 Comments