महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न.
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बऱ्हाणपूर येथे नागरिकांचे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर महात्मा बसवेश्वर तरुण मित्र मंडळ ब्रहानपूर व जतन फाउंडेशन पुणे, श्री स्वामी समर्थ सेवा भावी संस्था लखनगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डोंगरे साहेब उपस्थित होते. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये माननीय डोंगरे साहेबांचे गावकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शनलाभले. त्यांच्या हस्ते गरजू 239 नागरिकांना चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले. त्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच सौ.निर्मला मोरे, उपसरपंच राहुल पाटील, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाप्रमुख ओम हजारे, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत केसरकर,पोलीस पाटील संजय पाटील, अनिल मोरे, अर्जुन मोरे, हनुमंत मोरे, शिवलिंग पाटील तसेच ग्रामसेवक श्री सचिन सूर्यवंशी व अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

0 Comments