सामाजिक एकोप्यानेच समाजाची प्रगती होते, आजच्या युवकांना प्रबोधनाची गरज आहे : पोलीस आयुक्त एम. राजकुमार
छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने ईद मिलन कार्यक्रम संपन्न
सोलापूर- मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर आयोजित ईद मिलन आणि शेतकरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर काझी सय्यद अमजदअली काझी, शिवधर्म समन्वयक नेताजी गोरे, गुरूद्वार प्रमुख रमेश सिंघ वतवाणी, सिध्देश्वर देवस्थान मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू, फर्स्ट चर्चचे फादर रेव्ह. सुपर्ण कुमार घाटे, भारतीय बौद्ध महासभेचे अण्णासाहेब वाघमारे या धर्मगुरुंच्या उपस्थित सामाजिक एकोपा कार्यक्रमात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव इंजि. चंद्रशेखर शिखरे यांच्या हस्ते या शेतकरी बांधव श्री.भागवत वाघ (टरबूज), वैभव मोरे (डाळिंब), प्रशांत म्हमाणे (द्राक्षे), बालाजी गायकवाड (कलिंगड), बालाजी कोकाटे (पेरू), सुधाकर गरड (ड्रॅगन), सचिन लवंडे (अंजीर), ज्ञानेश्वर सावंत (सीताफळ) यांचा सत्कार करण्यात आला.
सर्व धर्मीय प्रमुखांसह हा कार्यक्रम म्हणजे एकतेचे प्रतिक असून नाउमेद नसलेल्या शेतकऱ्यांच सन्मान आणि धार्मिक प्रबोधन या सारख्या कार्यक्रमाची आवश्यकता असून याच सामाजिक एकोप्यानेच समाजाची प्रगती होते. तसेच आजच्या युवकांना स्वयंरोजगारासोबत प्रबोधनाची सुध्दा आवश्यकता आहे, असे मत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर अरिफ शेख, राजन जाधव, के. बी. नदाफ, शिवसेना गटनेते अमोल शिंदे, नगरसेवक प्रथमेश कोठे, बिज्जू प्रधाने, तौफिक शेख, नईम सालार, बाबा अड्डेवाले, युवराज पवार, शिवाजी वाघमोडे, रियाज हुंडेकरी, माजी प्राचार्य महेबूब दलाल, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष डॉ. जी. के. देशमुख, रियाज खैरदी, ॲड. रियाज शेख, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, मझहर पठाण, राजा बागवान, मुजीब खलिफा, समीऊल्ला शेख, सैफोद्दिन मनियार, फैज बागवान, एजाज आदिल, बाळासाहेब वाघमारे, प्रशांत पाटील, नगरसेविका वाहेदा भंडाले, अकिला भागानगरी, जयवंत सलगर, पोपट भोसले, श्रीकांत डांगे, प्रकाश शिंदे म.शफीक कॅप्टन, इम्तियाज कमिशनर, अलिम सय्यद, गदवाल सर, समीर सय्यद, अल्ताफ लिंबूवाले, जिल्हाप्रमुख अमर पाटील, प्रताप ढेंगळे, मुसरोद्दीन चौधरी, संजय जाधव, रमेश जाधव, सौरभ भांड, मोहन चटके, ॲड. अनुराग गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन आयोजक मतीन बागवान यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर गोड शुरकुर्मा आणि गुलगुल्याचा आस्वाद सर्व उपस्थितांनी घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यात जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, बशीर सय्यद, तन्वीर गुलजार ,जावेद बद्दी, राजू हुंडेकरी, हारुण शेख, कादर भागानगरी, रिजवान शेख, शब्बीर फुलमामडी, रिजवान दंडोती, रियाज पैलवान, वाहिद शेख, बशीर मडकी, रुस्तुम शेख, वाहिद तांबोळी, शेरु उस्ताद, कय्युम मोहळकर, मोहसीन शेख, हारिस शेख, ॲड. वसीम शेख, उजेर बागवान, सादिक मुजावर यांनी परिश्रम घेतले.

0 Comments