*पोलीस अधीक्षक स्तरावरील नवनियुक्त महिला दक्षता समिती ची पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बैठक*
याबाबत माहिती अशी की , पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय स्तरावरील महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली होती. सदर नवीन समिती सदस्यांची दिनांक 03/05/2023 रोजी 12.00 पोलीस अधीक्षक लातूर यांचे अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक आयोजित करण्यात येऊन सदर बैठकी मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय स्तरावर नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या महिला दक्षता समितीच्या एकूण 11 सदस्य हजर होते. पोलीस ठाणे स्तरावरील 15 महिला दक्षता समिती सदस्य 24 महिला पोलीस हवालदार हजर होते. यामध्ये सर्वप्रथम सर्व सदस्यांचे परिचय करून घेण्यात आले. तसेच महिला दक्षता समिती च्या कामकाजाबद्दल पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दक्षता समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन केले.
👉🏿 महिला कडून प्राप्त तक्रारीची विना विलंब तक्रार घेणे.
👉🏿महिला व मुलींच्या तक्रारी हाताळणे बाबत समाज घटकाचे सहकार्य घेणे.
👉🏿तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांच्या समस्या सोडवणे महिला अत्याचाराचा गुन्ह्यास प्रतिबंध करावयाच्या आवश्यक उपाययोजना महिला दक्षता समिती सदस्याने पोलिसांना सहकार्य करावे.
👉🏿पीडित महिलेस मानसिक शारीरिक पाठबळ देण्याकरिता महिला दक्षता समिती स्थापन करण्याच्या उद्देश असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
महिला दक्षता समिती सदस्याकडून आलेल्या अडचणींचा उहापोह करण्यात आला असून प्रत्येक शाळा कॉलेज इत्यादी ठिकाणी मुलींचा अडचणी सोडविण्यासाठी संवाद पेटी लावण्या संदर्भात तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मेडिकल,कॉफी शॉप इत्यादी ठिकाणी कार्यवाही करावी. ट्युशन एरिया येथे पेट्रोलिंग करून इमर्जन्सी नंबर लावण्याबाबत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेशित करण्यात आले आहे. तसेच मा. पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करून साभार परत प्रकल्प याबाबत माहिती दिली सदर बैठकी मध्ये सूत्र संचालन पोलीस उपनिरीक्षक श्रीमती शामल देशमुख यांनी केले. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी/अमलदार व महिला दक्षता सदस्य उपस्थित होत्या.
0 Comments