के.एम.सी. चॅरिटेबल अँड वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने बुधवारी एक दिवसीय हज प्रशिक्षण शिबीर

 

के.एम.सी. चॅरिटेबल अँड वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने 
बुधवारी एक दिवसीय हज प्रशिक्षण शिबीर







सोलापूर -के.एम.सी. चॅरिटेबल अँड वेल्फेअर ट्रस्ट, सोलापूर व सोलापूर जिल्हा खादीमुल हुज्जाज हज कमेटी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक ०३/०५/२०२३ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत के. एम. सी. गार्डन, सोशल हायस्कूल समोर, मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर येथे "एक दिवसीय हज प्रशिक्षण शिबीर" आयोजित करण्यात आले आहे..
सदर एक दिवसीय हज प्रशिक्षण शिबीरामध्ये उमराह कसे करावे, अहराम कसे बांधावे, तवाफ कसे करावे, रमल कसे करावे, इस्तबा कसे करो, सफा मरवाहची सही - कशी करावी, हजची नियत कशी करावी, मिना, अरफात, मुजदलीफा मध्ये काय करावे, रमी जमरात कशी करावी, कुर्बानी कुठे करावी, हलक कसे करावे अशा सखोल धार्मिक विधींचे प्रशिक्षण व प्रात्यक्षीक हज तज्ञ हाजी उस्मान जमादार हे मार्गदर्शन करणार आहे.
तरी सोलापूर शहर व जिल्हयातील तमाम हज यात्रेला जाणारे हज यात्रेकरूंनी सदरहू प्रशिक्षणसाठी वेळेवर उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष मुबीन डॉ. बशीर सय्यद यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: मुबीन सय्यद (८६०००००९०४), हाजी युनूस शेख (९०२८९६१६४८) व शफीक रचभरे (9960009980) यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments