एकही बौद्धाचे घर नसतानाही गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी जगाने आदर्श घ्यावा अशे हे वंदन गाव

 एकही बौद्धाचे घर नसतानाही गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी


 जगाने आदर्श घ्यावा अशे हे वंदन गाव






प्रतिनिधी :


विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उस्तवात भारत देशा बरोबर जगात साजरी झाली 155 देशापेक्षा जास्त देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली अमेरिका या देशाने तर त्यांच्या राष्ट्रीय ध्वजा बरोबर निळा ध्वज फडकवला आणी आपल्या देशात काही ग्रामीण भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला, आणी निळ्या झेंड्याला विरोध होताना आपण पाहतो परंतू 

वंदन, ता. सोनपेठ जि. परभणी या गावी एकही बौद्ध घर नसताना येथील होलार समाजाने मोठ्या उस्तावाने प्रति वर्षाप्रमाणे जयंती साजरी केली 14 एप्रिल रोजी समाज मंदिरावर निळा झेंडा लावून समाज मंदिरावर निळ्या पताक्याने सजवून जयंती साजरी केली

मी काही कामानिमित्त परभणी जिल्ह्याला गेलो आसता सोनपेठ येथील वंदन या गावी मुकामी राहिलो आसता मला असे समजले की या गावात एकही बौद्ध घर नसताना या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असते


खरोखर कोणत्याच महापुरुषाला जात नसते हे मात्र खरे आहे


वंदन या गावातील होलार समाजाला मानाचा जय भीम

Post a Comment

0 Comments