तीनशेच्या आसपास गोरगरीब गरजू लोकांना अन्नदान

 

तीनशेच्या आसपास गोरगरीब गरजू लोकांना अन्नदान







सोलापूर- सोलापुरात रोटी बँक संस्थेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत  सामाजिक कार्यकर्ते  आसिफभाई बागबान खलीफा यांनी शासकीय रुग्णालय जिल्हा सोलापूर येथे आपल्या वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून तीनशेच्या आसपास गोरगरीब गरजू रुग्णांना व रुग्णांचे नातेवाईकांना  अन्नदान करून आपला वाढदिवस रोटी बँक संस्थेसोबत साजरा केला.

संस्थेने जनतेला आवाहन केले होते की आपण जे वाढदिवस साजरा करतो त्यामध्ये केकफटाकेशालपार्टीकलर यामध्ये आपले पैसे खर्च न करता आपण आमच्या संस्थेसोबत अन्नदान करून आपला वाढदिवस साजरा करू शकतात. जेणेकरून तुमच्या वाढदिवस एक आदर्श वाढदिवस ठरू शकतो आणि तुम्हाला पुण्य भेटेल आणि गरीब लोकांचा आशीर्वाद पण मिळेल आणि आम्ही तुम्हाला पुष्पगुच्छ व मिठाई देऊन आणि तुमच्या हातांनी जेवण वाटप करू आणि  फोटो व्हिडिओच्या माध्यमातून बातमी पण देऊ. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जमीरभाऊ पठाण यांनी संस्थेच्या या नवीन उपक्रमाबद्दल माहिती दिली आणि आवाहन पण केले की दररोज एक वेळचा संध्याकाळच्या जेवण  न चुकता रोटी बँकतर्फे देण्यात येते. तरी आपण रोटी बँक सोबत आपला वाढदिवस साजरा करावा आणि आपला देश गंगा जमुना संस्कृतीचा प्रतीक आहे त्यासाठी समाजामध्ये शांतीअमनभाईचाराराष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेच्या हितासाठी जेवढे काम होईल तेवढा काम करावा.

यावेळी  सोमनाथ उपासेसमीर पठाणसत्तार शेख ,जुबेर सय्यदतंनजिम चे हाफिज मेहबूब नदाफ,भारतीय अमन ग्रुपचे नजीर अहमद मुजावर,  ॲडआसीम  बांगीइरफान सय्यदमनोज देवकरशोएबभाई चौधरी (ST), फैयाज बागवानफैयाज शेखसाकिब खलिफाआनंद गोसकीअबिदभाई राईलीसाहिल शहापुरे व सर्व रोटी बँक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

Post a Comment

0 Comments