माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून कव्हा येथील मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा

 माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून कव्हा

 येथील मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा

लातूर दि.24/04/2023






मुस्लीम बांधवांचा महत्त्वपूर्ण व पवित्र सण म्हणून रमजान ईद हा आनंदाने साजरा केला जातो. या सणाच्या माध्यामातून एकमेंकातील बंधुभावाचे नाते दृढ करण्याचे कार्य केले जाते. तीच परंपरा कायम ठेवत रजमान ईदनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी रमजान ईदनिमित्त लातूर तालुक्यातील कव्हा येथील बद्रूद्दिन शेख यांच्या फार्म हाऊसवर जाऊन कव्हा येथील सर्व मुस्लीम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

रमजानच्या या पवित्र महिण्यात चंद्रदर्शन होईपर्यंत रोज उपवास केले जातात. सूर्य उगवण्यापूर्वी अन्‍नाचे ग्रहण करायचे आणि संपूर्ण दिवस सूर्यास्त होईपर्यंत उपवास पाळायचा सूर्यास्त झाल्यानंतर नमाज करून प्रार्थना करायची आणि उपवास सोडायचा, असा नियम संपूर्ण महिणाभर मुस्लीम समाजबांधव पाळतात. या पवित्र सणानिमित्त महिणाभर कुराण ग्रथांचे वाचन, चिंतन-मनन करण्याची परंपरा आहे. या रमजान ईदनिमित्त भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी कव्हा येथील मुस्लीम बांधवासह ग्रामस्थांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कव्हा येथील बद्रुद्दिन शेख, जाफर पटेल, प्रा.गोविंद घार, भागवतराव घार, एम.एन.एस.बँकेचे संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, कव्ह्याचेे उपसरपंच किशोरदादा घार, नेताजी मस्के, अतिष खंडागळे, गोपाळ सारगे, किशन प्रभू दुधाळे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी कव्हेकर परिवाराने दिलेल्या शुभेच्छामुळे कव्हा येथील मुस्लीम बांधवांच्या चेहर्‍यावरील आनंद द्विगुणीत झाला असल्याचे दिसून आले.  

Post a Comment

0 Comments