विद्यार्थ्याच्या फीस चे पैसे असलेले रस्त्यावरील पॉकेट हॉटेल चालकाने केले परत.
शेख बी जी.
औसा.दि.28 औसा तालुक्यातील मौजे भादा येथे 28 मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बोपला या गावावरून येणाऱ्या एका विद्यार्थ्याचे पॉकेट भादा येथील सचितानंद महाराज मंदिराजवळ पैसे असलेले पॉकेट रस्त्यावर पडल्याचे एका हॉटेलच्या मालकास दिसले. आवाज दिला असता गडबडीत असलेले हे संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी न थांबल्यामुळे ते पॉकेट त्यांनी जवळ ठेवले व त्यात काय ओळखीचे मिळते का हे शोधले तर त्यात असलेल्या आधार कार्डवर जे नाव होते ते नाव व त्या गावावरील पत्त्याच्या आधारे त्या गावातील ओळखीच्या व्यक्तीला फोन करून गणेश भागवत या विद्यार्थ्यांचे पैसे असलेले पॉकेट पडले आहे त्या विद्यार्थ्याला संपर्क साधून पॉकेट घेऊन जावे असे सांगितले. समोरील व्यक्तीने तात्काळ संपर्क करून जवळपास 20 किलोमीटर दूर गेलेल्या त्या विद्यार्थ्याला फोन केला व ते पाकीट घेऊन जाण्यास सांगितले. फोन आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत विद्यार्थी परत आला व त्याने आपली ओळख सांगितली मला हे पैसे फीस भरण्यासाठी घरून दिले आहेत व मी उमरगा या ठिकाणी शिक्षण घेत असल्याचे त्यांनी हॉटेल मालक चंद्रकांत घोडके यांना सांगितले.तात्काळ त्या हॉटेल चालकाने ते पॉकेट परत केले . आजही या जगात असे व्यक्ती आहेत म्हणून सर्व व्यवस्थित होत आहे.नाहीतर लुटमार सरेआम सुरू आहे.
0 Comments