अमृशा बाबा शाळेमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिन साजरा.

 अमृशा बाबा शाळेमध्ये  राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिन साजरा.







शेख बी जी.


औसा.दि.06. औसा तालुक्यातील मौजे आंदोरा येथे अमृशा बाबा शाळेत राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक शाळेला 100 वा स्मृतीदिन साजरा करण्याचे आदेशित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शाळेतील मुख्याध्यापकासह कर्मचाऱ्यांनी स्मृतिदिन साजरा करून विनम्र अभिवादन केले. यावेळी भेटा केंद्राचे केंद्रप्रमुख शारवाले एम.ए. यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घातले. शाळेचे मुख्याध्यापक पठाण टी आर तसेच मेहताब माळेगाव शाकिरखान पठाण, बाणीकर एम.आय.मणियार ए,ए, शेख सोहेल, मंजूर शेख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना केंद्रप्रमुख शारवाले सर यांनी असे सांगितले की शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य अतुलनीय होते.त्यांच्या या कार्यामुळेच शिक्षणाची गंगा खेडोपाड्यापर्यंत पोहोचली. त्यांनी केलेल्या कार्याची महाराष्ट्राला आठवण राहावी म्हणून राज्य शासनाने प्रत्येकाला स्मृतीदिन साजरा करण्याचे अनिवार्य केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments