शेतीच्या सुरक्षेसाठी बांधावर किंवा शेताच्या कडेला विद्युत प्रवाहाचा वापर करू नका; निष्काळजीपणामुळे मनुष्य अथवा जनावरांचा मृत्यू झाल्यास संबंधित शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार.*


*शेतीच्या सुरक्षेसाठी बांधावर किंवा शेताच्या कडेला विद्युत प्रवाहाचा वापर करू नका; निष्काळजीपणामुळे मनुष्य अथवा जनावरांचा मृत्यू झाल्यास संबंधित शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार.*





               

                   सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शेतातील पिकांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी काही शेतकरी शेताच्या बांधावर अथवा कडेला विद्युत प्रवाह सोडत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, ही पद्धत अत्यंत धोकादायक असून कायद्यानेही गंभीर स्वरूपाचा निष्काळजीपणा मानला जातो. अशा विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येऊन जनावरांसह शेतात काम करणारे मजूर, शेतकरी, पादचारी किंवा इतर नागरिक यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. काही घटनांमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या स्वतःच्या कुटुंबीयांनाही विजेचा धक्का बसून गंभीर अपघात झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत.

                   या पार्श्वभूमीवर, कोणत्याही शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बांधावर अथवा कडेला बेकायदेशीररीत्या विद्युत प्रवाह सोडला आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा किंवा जनावराचा मृत्यू अथवा गंभीर दुखापत झाल्यास संबंधित शेतकऱ्याविरुद्ध लागू कायद्यानुसार तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांना पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी दिल्या आहेत.

                  लातूर जिल्हा पोलीस दल सर्व शेतकऱ्यांना आवाहन करत आहे की, पिकांच्या संरक्षणासाठी विद्युत प्रवाहाचा वापर न करता कायदेशीर व सुरक्षित पर्यायी उपाययोजना अवलंबाव्यात. मानवी जीवन आणि मुक्या प्राण्यांचे संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून, थोड्याशा निष्काळजीपणामुळे जीवितहानी होऊन गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

Post a Comment

0 Comments