लातूर कॉलेज ऑफ फार्मसी दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्नशील- प्राचार्य डॉ शामलीला बावगे
औसा प्रतिनिधी
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था हासेगाव संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव या महाविद्यालयातून तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांच्या मदतीने अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने युक्त असलेली सुसज्ज प्रयोगशाळा तसेच डिजिटल क्लासरूम इत्यादींच्या मदतीने औषध निर्माण शास्त्र विभागांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे अशी माहिती प्राचार्य शाम लिला बावगे यांनी दिली. हासेगाव येथील ग्रामीण भागात निसर्गरम्य जागेमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता या सोबतच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट देण्यासाठी संस्था पाठपुरावा करते तर विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना स्वतंत्र वस्तीग्रह तसेच लातूर येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा देते तर सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना फीस भरण्यासाठी हत्या हप्त्याने सवलत देण्यात येते. शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनाही महाविद्यालयाच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लातूर कॉलेज ऑफ फार्मसी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देते असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
0 Comments