- दिनांक ६ ऑगस्ट रोजी ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेतर्फे 'पाऊस- शेती मातीच्या कविता' या विषयावर ऑनलाईन कवीसंमेलन घेण्यात आले.यामध्ये महाराष्ट्रभरातून चाळीस कवी,कवयित्रींनी सहभाग नोंदवला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रामीण मराठी मुस्लिम साहित्य संस्थेतर्फे संस्थेच्या सहसचिव अनिसा सिकंदर शेख यांनी ऑनलाईन काव्य संमेलनाचे आयोजन केले होते.या संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध कवी डाॅ.हबीब भंडारे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिष्ठित कवयित्री अक्षता देशपांडे या संमेलनाला उपस्थित होत्या.संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण चाळीस कवी ,कवयित्रींनी या संमेलनात सहभाग नोंदविला. अ.रहीम चंद्रपूर , मेहमूदा शेख देहूरोड पुणे ,कांचन नेवे ,सौ.कमल सोनजे, नागेश बोंतेवाड, सुभाष मोहनदास ,डॉ. गीता वाळके नागपूर ,राहुल भोसले, बाबुराव पाईकराव, विद्या प्रकाश माने मंगळवेढा . बी.एल. खान बुलढाणा, मलेका शेख- सैय्यद सिन्नर, आनंद चोपडे बेळगाव, बाबासाहेब ढोबळे ,वाय के शेख ,शोभा वागळे मुंबई, सिंहल मेंढे पुणे ,रेखा सोनारे, सिद्धी स्नेहल चाळके , प्रा. विरशहा आत्राम, वरोरा चंद्रपूर, रेखा कुलकर्णी, अख्तर पठाण यांच्या एकापेक्षा एक बहारदार कवितांनी कार्यक्रमाला रंगत आणली.पावसाची विविध रूपे आणि माणसाचे त्यांच्याशी असलेले नाते यावेळी उलगडत गेले.अगदी 'पहिला पाऊस' अशा प्रेमकविता ते महापूर,शेती,पीक,निसर्ग,श्रावण अशा विविध विषयांवर कविता सादर करण्यात आल्या.
संस्थेचे अध्यक्ष हाशम ई. पटेल यांनी संमेलनास शुभेच्छापर संदेश दिला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शफी बोल्डेकर यांनी संस्थेने पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख यांच्या नावाने साहित्य संमेलन सुरू करून ऐतिहासिक कार्य केले. तसेच त्यांच्या नावाने शिक्षिकांसाठी पुरस्कार सुरू असल्याची माहिती यावेळी दिली. कविता म्हणजे कल्पनेचा विस्तार अशी सुटसुटीत कवितेची व्याख्या अक्षता देशपांडे यांनी मांडली. नवख्या कविंनी आपल्या कवितांमध्ये आशय कसा मांडावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ.हबीब भंडारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. संस्थेचे सचिव डाॅ. सय्यद जब्बार पटेल यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि संमेलनाची सांगता झाली.या संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन कवी गौसपाशा शेख आणि कवयित्री मलेका शेख यांनी केले.
0 Comments