अ भा मुस्लीम मराठी साहित्य परिषदेचा "साहित्य सोहळा "
सोलापूर - अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषद,सोलापूरच्या वतीने "पुस्तकांवर बोलू काही"
या उपक्रमा अंतर्गत तीन पुस्तकांचे चिकित्सक विवेचन व राज्य स्तरीय कवी संमेलन रविवार, ५ जुलै २०२६
सकाळी ११. ते सायंकाळी ४ पर्यंत सोशल महाविद्यालय, किडवाई चौक, सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे प्रा. डॉ. इ. जा. तांबोळी लिखित कादंबरी " श्यामचा बाप " कवी मुबारक शेख लिखित काव्यसंग्रह " अज़ान आणि चालिसा " आणि प्रा. डॉ. शकील शेख लिखित कादंबरी "ज़ुबा " या वर प्रा डॉ . सुरैरया परवीन जहागीरदार , कवि खाजा भाई बशीर बागाबान , व प्रा बी एच करजगीकर हे विवेचन करतील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा . डॉ दस्तगीर जमादार ( अक्कलकोट )) हे असतील .
दुपारच्या दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय काव्य संमेलन प्रा अनिसा सिकंदर शेख ( दौंड ) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात राज्यतले ४० कवि ,कवियत्रीचा सहभागी होणार आहे .
मराठी भाषा, साहित्य आणि वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी आयोजित या आगळ्यावेगळ्या साहित्य सोहळ्यास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन अध्यक्ष प्रा डॉ. अजीज नदाफ , सचिव अय्यूब अहमद नल्लामंदू यांनी केले आहे .
📙📙📙📙📙📙📙📙


0 Comments